Kolhapur: ‘करवीर’मध्ये महायुतीत बंड, पण हादरा काँग्रेसला; पाटील-नरके यांच्या लढाईत जनसुराज्यमुळे रंगत

By राजाराम लोंढे | Published: October 14, 2024 04:37 PM2024-10-14T16:37:31+5:302024-10-14T16:38:10+5:30

राहुल पाटील यांची ’सहानुभूती’ची तर नरके यांची ‘संपर्काची हवा

Congress's Rahul Patil and Shindesena's Chandradeep Narake are fighting in the Karveer Assembly Constituency due to Jansuraj | Kolhapur: ‘करवीर’मध्ये महायुतीत बंड, पण हादरा काँग्रेसला; पाटील-नरके यांच्या लढाईत जनसुराज्यमुळे रंगत

Kolhapur: ‘करवीर’मध्ये महायुतीत बंड, पण हादरा काँग्रेसला; पाटील-नरके यांच्या लढाईत जनसुराज्यमुळे रंगत

राजाराम लोंढे

कोल्हापूर : ‘करवीर’मध्येकाँग्रेसकडून राहुल पाटील व शिंदेसेनेकडून चंद्रदीप नरके यांच्यात सरळ लढत होईल, असे वाटत असताना जनसुराज्य पक्षाचे नेते आमदार विनय कोरे यांनी संताजी घोरपडे यांची उमेदवारी घोषित करून लढत आणखी रंगतदार केली आहे. 

पन्हाळ्यातून जनसुराज्य पक्षाची साथ नेहमीच दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांना मिळाली. त्यामुळे घाेरपडे यांची उमेदवारी महायुतीमध्ये बंड मानले जात असले तरी त्याचे हादरे मात्र काँग्रेसला बसण्याची शक्यता अधिक आहे. पाटील व नरके यांच्या लढाईत घाेरपडे यांच्या उमेदवारींनी नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

नरके हे पराभूत झाल्यापासून नव्याने बांधणीला लागले होते. संपर्क व राजकीय मुत्सद्दीगिरीच्या बळावर त्यांनी हवा केली आहे. राहुल पाटील यांना दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांची सहानुभूती आहे, पण सहानुभूती शेवटपर्यंत टिकवून मैदान मारण्याचे आव्हान त्यांच्या राहणार हे मात्र निश्चित आहे.

पन्हाळ्यातील दुरुस्ती नरकेंना सावरणार?

मागील निवडणुकीत पी. एन. पाटील यांना पन्हाळा व गगनबावड्याने मोठा ‘हात’ दिला होता. त्या बदल्यात श्रृतिका काटकर यांना जिल्हा बँकेची उमेदवार संधी दिली. त्यामुळे शाहू काटकर यांच्यावर पन्हाळ्याची जबाबदारी आहे. पण, मागील निवडणुकातील चुका दुरुस्त करत चंद्रदीप नरके यांनी लावलेल्या जोडण्या यशस्वी झाल्या तर बालेकिल्ला पूर्ववत राहू शकतो.

सतेज पाटील, ‘चेतन’ यांच्यावर ‘राहुल’ यांची मदार

करवीर’मध्ये आमदार सतेज पाटील व ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके यांची निर्णायक ताकद आहे. मागील निवडणुकीत या दोघांमुळेच पी. एन. पाटील यांनी चंद्रदीप नरके यांची हॅटट्रिक रोखली होती. आमदार पाटील व डॉ. नरके हे किती ताकदीने उतरणार यावरच येथील गणित अवलंबून राहणार आहे.

राजेंद्र सूर्यवंशी यांची चाचपणी

‘करवीर’चे माजी सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनीही चाचपणी सुरू केली आहे. त्यांनी निवडणूक लढवण्याची घोषणा अद्याप केलेली नाही. ‘जनसुराज्य-शेकाप’ आघाडीकडून २०१४ ला त्यांनी नशीब आजमावले होते, पण त्यांना यश आले नाही. त्यांच्यासह कॅप्टन उत्तम पाटील यांनीही तयारी केली आहे.

मागील २०१९ ला उमेदवारांना मिळालेली मते 

  • पी. एन. पाटील : १,३५,६७५
  • चंद्रदीप नरके : १,१३,०१४
  • डॉ. आनंद गुरव : ४,४१२


सध्याचे मतदान 

  • एकूण : ३,२०,८१९
  • पुरुष : १,६६,२६१
  • महिला : १,५४,५५८

Web Title: Congress's Rahul Patil and Shindesena's Chandradeep Narake are fighting in the Karveer Assembly Constituency due to Jansuraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.