कोल्हापूर : एकापाठोपाठ एक लोकशाही संस्था उद्ध्वस्त करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रोखणे हा काँग्रेसचा एकमेव अजेंडा आहे. यामध्ये पक्षीय मतभेद न आणता तडजोडीची भूमिका सर्वच विरोधी पक्षांनी घेतली असल्याची वस्तुस्थिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडली.चव्हाण यांनी शनिवारी दुपारी ‘लोकमत’च्या कोल्हापूर शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांनी देश आणि राज्यातील विविध प्रश्नांबाबत मनमोकळी चर्चा केली.ते म्हणाले, हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये भाजपाने गेल्या लोकसभेवेळी २७३ पैकी २२३ जागा मिळविल्या होत्या; परंतु याच पट्ट्यात आता आमची संपुआ आघाडी मजबूत झाली आहे. त्यामुळे तेथे भाजपाच्या १00 ते ११0 जागा कमी होणार आहेत. कर्नाटकात ते ५- ६ पर्यंत खाली येतील. पूर्व भारतातील सात जागा त्यांना टिकविता येणार नाहीत.
नरेंद्र मोदी यांना रोखणे हेच काँग्रेसचे ‘टार्गेट’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2019 4:02 AM