लोकमत न्यूज नेटवर्क
पेठवडगाव : सादळे येथील सिद्धोबा मंदिर परिसरात वर्षभर वडगावातून येवून डोंगरावरील झाडांना पाणी घालून वृक्ष संवर्धन करण्यात आले. तर यावर्षी जून महिन्यात ६०० झाडाचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. हा उपक्रम येथील योग सेवा फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येत आहे.
टोप - जोतिबा रस्त्यांवर सादळे येथे उंच टेकडीवर सिद्धोबा मंदिर आहे. वरील भाग सकल आहे.येथे गतवर्षी योग सेवा व अन्य संघटनांनी वृक्षारोपण केले आहे. ही झाडे जगविण्याचे आव्हान होते. या पार्श्वभूमीवर योग सेवा फाउंडेशन यांनी मार्च नंतर झाडांना पाणी, खते घालून, खड्डे खोदून ठेवण्याचे काम सुरू केले होते. यामध्ये सदस्यांनी वर्गणी काढून तर फळ, फुल झाडे, देशी झाडे आदी संकलित करून ठेवली. आता दररोज सहा ते आठ वृक्ष सेवा देत आहेत. हे वडगावातील सर्व जण व्यावसायिक आहेत. त्यांना देवस्थानचे बाबासाहेब पाटील यांचे सहकार्य लाभले.
यामध्ये राजेंद्र जाधव, योगेश कुंभार, सागर सणगर, महेश्वर पाटील, विजय मोहिते, प्रमोद पाटील, सतीश गाताडे, ओमकार पाटील, अनिल गाताडे, सचिन सावर्डेकर, नितीन सावर्डेकर, चौगुले, मिलिंद साखळकर, सतीश पन्हाळकर, मोहन माळी, निखिल पाटील, शाम माळकर, आकाश होणोले, अनंत होणोले, विनायक माळी, आणशू पाटील, प्रथमेश पाटील आदींचा समावेश आहे.
चौकट:
योग फाउंडेशनचे ७५ सदस्याच्या वाढदिवसाला सिद्धोबा डोंगरावर वृक्षारोपण करण्यात येत. त्या सदस्याने आपल्या झाडांची काळजी स्वतः घेण्याची सवय लावण्यात येते.
सदस्यांचा वाढदिवस साजरा करताना झाडांचे
फोटो कॅप्शन
पेठवडगाव : सादळे येथील सिद्धोबा मंदिर परिसरात वृक्षारोपण करण्यात येत आहे.यात सहमागी योग फाउंडेशनचे सदस्य (छाया : सुहास जाधव)
0000