नसिम सनदी ।दुर्मीळ वनौषधी म्हणून वापरल्या जाणाºया जंगली आल्याच्या दोन नवीन जाती शोधून काढण्यात कोल्हापुरातील डॉ. अभिजित कासारकर यांना यश आले आहे. कासारकर हे मूळचे नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथील आहेत. ते सध्या विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथे प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. महाराष्ट्रभर भटकंती करून कोकण आणि गडचिरोली येथे त्यांना या दोन आलेवर्गीय वनस्पतींचा शोध लागला. या शोधाची दखल तमिळनाडूच्या व्ही. बी. गौड संस्थेने घेत कासारकर यांना यावर्षीच्या युवा संशोधक पुरस्कारासाठी निवडले आहे. त्यांच्या या वाटचालीबद्दल त्यांच्याशी केलेली बातचीत.
प्रश्न : जंगली वनस्पतींच्या संशोधनाकडे कसे वळला.उत्तर : मी २०१३ मध्ये पीएच.डी.साठी जंगली वनस्पतींचाच विषय घेतला होता. यावर अभ्यास करताना याची गोडी लागत गेली. यातून जंगली आल्याचा संदर्भ सापडला. हे औषधी असल्याचे वाचनात आल्यानंतर तर त्याचा कसोशीने शोध सुरू केला. कोकण आणि गडचिरोलीमध्ये हा शोध संपला. तेथे या आलेवर्गीय दोन वनस्पती आढळून आल्या. त्याचे झिंगीबेर मोन्टॅनम आणि झिंगीबेर कॅपिटॅनम असे शास्त्रीय नाव आहे.
प्रश्न : अशा प्रकारच्या वनस्पती आणखी कुठे आढळतात.उत्तर : अतिपाऊस आणि विशिष्ट प्रकारच्या मातीतच या कंदाचा विकास होत असल्याने केरळ, तमिळनाडूतील जंगलातच याचे प्रमाण जास्त दिसते. महाराष्ट्रात त्याचे दर्शन फारच दुर्मीळ होते. संशोधनाच्या निमित्ताने फिरल्यानंतरच या दोन वनस्पती महाराष्ट्रातही असल्याचे स्पष्ट झाल्याने खूपच आनंद झाला.पेटंट मिळवणारऔषधनिर्मिती करणा-या कंपन्यांकडून याला मोठी मागणी आहे. भविष्यात यात अधिक संशोधन करण्याचा आपला मानस आहे. दोन वनस्पतींचा शोध हे आपले यश असून, त्यावरील पेटंट मिळवण्यासाठी प्रयत्न असणार आहेत. जंगली आल्याबरोबरच हळदही औषधी वनस्पती असल्याने त्याच्या संशोधनात अधिक लक्ष घालणार आहे.या आल्याचे औषध गुणधर्मएखादी जखम झाली, मुकामार लागला तर येणारी सूज कमी करण्यासाठी या आल्याचा रस अथवा चूर्ण लेप म्हणून लावला जातो असे जंगलात फिरताना स्थानिक लोकांकडून ऐकले होते. ते प्रयोगशाळेत तपासून पाहिले असते, ते खरे असल्याचे सिद्ध झाले.