शोभाताई कोरे यांनी वारणा साखर कारखान्यासह वारणा महिला उद्योग समूह सक्षमपणे चालविला. त्यांनी वारणेला नावलौकिक प्राप्त करून दिला. सहकार, सामाजिक आणि महिला सबलीकरण क्षेत्रातील त्यांच्या कार्याची आठवण फडणवीस यांनी चर्चेवेळी आवर्जून केली. यानंतर फडणवीस यांनी डॉ. कोरे यांच्याकडून वारणा समूहातील संस्थांची माहिती घेतली. या भेटीमध्ये मात्र राजकीय अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वारणा बँकेचे अध्यक्ष निपुण कोरे, विश्वेश कोरे, जनसुराज्य शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार सुधीर गाडगीळ, माजी आमदार अमल महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, पश्चिम देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, यंत्रमागचे माजी अध्यक्ष हिंदुराव शेळके, जिल्हा परिषदेचे सदस्य अशोकराव माने उपस्थित होते.
२७ कोरे
फोटो ओळ-
वारणानगर येथे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे यांच्या निवासस्थानी भेट देऊन सांत्वन केले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी आमदार सुरेश हाळवणकर, निपुण कोरे, धनंजय महाडिक, आदी उपस्थित होते.