कोल्हापूर : बिंदू चौक सबजेलमध्ये कर्तव्यावर असणारे हवालदार चंद्रकांत तुकाराम पाटील (वय ५४, रा. प्रतिभानगर, मूळ रा. पासार्डे, ता. करवीर) याचा मंगळवारी सायंकाळी हृदयविकाराने मृत्यू झाला. त्यांची ३२ वर्षे सेवा झाली होती. त्यांनी सेवाकाळात सातारा, येरवडा (पुणे), सोलापूर, कळंबा, बिंदू चौक सबजेल येथे काम केले.
मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते कर्तव्यावर हजर झाले. दिवसभराच्या कामकाजानंतर सायंकाळी साडेपाच वाजता नेहमीप्रमाणे त्यांनी सबजेलच्या सर्कलमध्ये फेरी मारुन पाहणी केली. त्यानंतर आराम करण्यासाठी खुर्चीवर बसले असता, त्यांना काहीसे अस्वस्थ वाटू लागले. सबजेलमधील कर्मचाऱ्यांनी त्यांना तातडीने सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा असा परिवार आहे.
फोटो नं. ०२०३२०२१-कोल-चंद्रकांत पाटील (सबजेल)