शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

Kolhapur: तरुणांची माथी भडकविण्याचा प्रयत्न, काही तरी वेगळे घडेल; माजी गृहराज्यमंत्र्यांनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2023 11:44 AM

कोल्हापूर जिल्ह्यात अशांतता निर्माण करण्याचा काही शक्तींचा सातत्याने प्रयत्न

कोल्हापूर : बेरोजगारी, महागाई यासारख्या जनतेला त्रासदायक ठरलेल्या गोष्टींवरून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठी अनुचित घटना घडवून तरुणांची माथी भडकविण्याचे प्रयत्न कोल्हापुरात सुरू आहेत. म्हणून येत्या दोन-तीन महिन्यात असं काही तरी वेगळे घडेल म्हणून आम्ही लवकरच पोलिस अधीक्षकांना भेटणार आहोत, असे माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.कोल्हापूर जिल्ह्यात अशांतता निर्माण करण्याचा काही शक्तींचा सातत्याने प्रयत्न होत आहे. मागच्या काही वर्षात सांगली-मिरज भागात जातीय दंगल घडवून आणली गेली आणि त्याचा राजकीय फायदा विशिष्ट पक्षाला मिळाला. म्हणूनच आमच्या मनात शंका आहे की कोल्हापुरातही असेच काही तरी घडेल. कारण गेल्या काही महिन्यापासून व्हॉट्सॲपच्या माध्यमातून चुकीचे मेसेज पाठविले जात आहेत. त्यातून तरुणांची माथी भडकविली जात आहेत, असे पाटील यांनी सांगितले.जिल्ह्यात घडलेल्या घटना किंवा पन्हाळा येथे घडलेली घटना या समज, गैरसमज निर्माण केल्यामुळेच घडल्या आहेत. कोल्हापूर ही छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे. या नगरीने देशाला समतेचा विचार दिला. अशा नगरीत सामाजिक ध्रुवीकरण होत आहे ही बाब अत्यंत चुकीची आहे. म्हणून माझ्या जिल्ह्यातील तरुणांना एक विनंती आहे की, चुकीचे मेसेज येतात त्यावर विश्वास न ठेवता जातीय सलोखा बिघडविणाऱ्या घटना रोखण्याच्या कामात पुढाकार घ्यावा, असेही पाटील म्हणाले.

रंकाळ्यावर काँक्रिटीकरण नकोरंकाळा तलावावर सुरू असलेल्या विकासकामांबाबत काही नागरिक तक्रार करतात. तेथे नुसते काँक्रिटीकरण केले जाऊ नये तर त्याचे मूळ नैसर्गिक सौंदर्य तसेच रहावे, अशी अपेक्षा सतेज पाटील यांनी व्यक्त केली.जिल्ह्यातही महाविकास आघाडीकोल्हापूर जिल्ह्यातही लोकसभेची निवडणूक महाविकास आघाडीमार्फतच लढविली जाईल. तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून उमेदवार ठरवतील. ज्यावेळी बैठक हाेईल तेंव्हा काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून आम्ही तेथे आमचे म्हणणे मांडू. पण आताच कोण उमेदवार असेल हे सांगणे उचित होणार नाही, असे पाटील म्हणाले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलPoliceपोलिस