आजवर हा मतदारसंघ भाजपाकडे होता. अनेक प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष केले आणि त्याचाच परिपाक म्हणून या सुज्ञ मतदारांनी मला निवडून दिले. त्यांनी ठेवलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही, असा विश्वास आमदार अरुण अण्णा लाड यांनी या दरम्यान दिला.
या दौऱ्यादरम्यान आमदार ऋतुराज पाटील, डी. वाय. पाटील कॉलेजचे संजय पाटील, शेकापचे माजी आमदार संपतराव पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, भैया माने, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार पी. एन. पाटील, आमदार सुजित मिणचेकर, आमदार राजू आवळे, खासदार राजू शेट्टी, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, खासदार धैर्यशील माने, संजय मंडलिक, माजी आमदार राजेश क्षीरसागर, अर्जुन आबिटकर, जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासो पाटील, माजी आमदार सत्यजित पाटील, शिवसेनेचे माजी आमदार उल्हास पाटील यांच्यासह शिवराज शिक्षण समूहाला भेट दिली. कोल्हापूर दौऱ्यादरम्यान भेटी घेऊन आभार मानले.
फोटो ओळ : कोल्हापूर दौऱ्यादरम्यान आमदार अरुण अण्णा लाड यांचा सत्कार करताना आमदार राजेश पाटील आणि कार्यकर्ते.