शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
2
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
3
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
4
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
5
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
6
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
7
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
8
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
9
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
10
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
11
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
12
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
13
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
14
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
15
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
16
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
17
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
18
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
19
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
20
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story

Kolhapur: आजरा-बांदा महामार्गावर टोलवसुलीच्या हालचाली; जमीन संपादन, पण शेतकरी भरपाईपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 1:24 PM

महामार्गाचे ५० टक्के काम अपूर्ण : आजरा एमआयडीसीजवळ द्यावा लागणार टोल

शीतल सदाशिव मोरेआजरा : संकेश्वर-आजरा-बांदा राष्ट्रीय महामार्गावरीलटोलनाका आजरा एमआयडीसीजवळ उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. राष्ट्रीय महामार्गाचे काम ५० टक्केही पूर्ण झालेले नाही. आजरा, हिरलगे, भादवण, भादवणवाडी, धनगरमोळासह जंगल क्षेत्रातील रस्त्याचे काम झालेले नाही. महामार्गाचे काम पूर्ण होण्यापूर्वीच टोल वसुलीला सुरुवात करण्याचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.महामार्गाचे काम गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. महामार्गावरील लहान-मोठे ४० पूल व अनेक नागमोडी वळणे काढून रस्ता सरळ केला आहे. काँक्रीटच्या रस्त्यावरून एकेरी वाहतूक सध्या सुरू आहे. अनेक ठिकाणी पुलांचे काम अर्धवट स्थितीत असून पूल व काँक्रीटचा रस्ता यामध्ये गॅप राहिल्यामुळे पुलांवर स्पीडब्रेकर तयार झाला आहे. आजऱ्याजवळील हिरण्यकेशी नदीवरील व्हिक्टोरिया पुलाला पर्यायी पूल बांधून तो वाहतुकीसाठी खुला केला आहे. मात्र, पुलावरून एकेरीच वाहतूक सध्या सुरू आहे. अनेक ठिकाणच्या पुलांवरून अशीच एकेरी वाहतूक सुरू आहे.

लेंडओहोळवरील पूल धोकादायकचलेंडओहोळवरील पूल १०० वर्षांपूर्वीचा धोकादायक स्थितीत आहे. रस्त्याचे काम करताना त्यावर तीनवेळा भगदाड पडले आहे. नवीन पुलासाठी आजरेकरांची आग्रही भूमिका आहे. मात्र, महामार्गाच्या कामात हा पूल धरलेला नाही. पूल झाला नाही तर पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी दुकानात येऊन घुसणार आहे, तर असणारा पूल अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे कोसळण्याची शक्यता जास्त आहे.

टोलवसुली व कर्मचारी निवासस्थानाचे काम अंतिम टप्प्यातराष्ट्रीय महामार्गावरील टोलनाका आजरा ‘एमआयडीसी’शेजारी आहे. या ठिकाणी टोलवसुली व कर्मचारी निवासस्थानाचे काम युद्धपातळीवर सुरू असून अंतिम टप्प्यात आहे. १५ जून किंवा १ जुलैपासून टोलवसुलीला सुरुवात करण्याचे नियोजन आहे.जमीन संपादन; पण शेतकरी भरपाईपासून वंचितराष्ट्रीय महामार्गासाठी आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन भरपाईपूर्वीच कामाला सुरुवात केली आहे. कागदोपत्री ताब्यात घेतलेल्या जमिनीपेक्षाही जास्त जमिनीवर राष्ट्रीय महामार्गाच्या ठेकेदारांनी अतिक्रमण केले आहे. अशा जमिनीची भरपाई देताना मात्र शासनस्तरावर टाळाटाळ होत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरhighwayमहामार्गtollplazaटोलनाका