कोल्हापूर : जी व्यक्ती नागरीकांचे आरोग्य जपण्याकरीता स्वत:चे आरोग्य धोक्यात घालून रोज काम करते, अशा व्यक्तीच्या हस्ते विकास कामाचा शुभारंभ करण्या नवा प्रघात नगरसेवक अजित ठाणेकर यांनी सुरु केला.तटाकडील तालीम प्रभागातील वांगी बोळ येथील नविन ड्रेनेज लाईन च्या कामाचा शुभारंभ, प्रभागात सफाई (ड्रेनेज) कर्मचारी म्हणून कार्यरत असणा-या लतिफ शेख यांचे हस्ते सोमवारी करण्यात आला. तटाकडील तालीम प्रभागातील बहुतांश ड्रेनेज लाईन्स २५ ते ३० वर्षापूर्वीच्या आहेत. त्यावेळच्या लोकसंख्येला अनुलक्षून टाकलेल्या या लाईन्सची क्षमता आता कमी पडत असल्यामुळे परीसरात वारंवार लाईन्स चोक अप होऊन नागरी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
ही समस्या लक्षात घेउन नगरसेवक ठाणेकर यांनी या लाईन्स बदलणेबाबत नागरीकांना वचन दिले होते. या उपक्रमाचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब गणपुले यांनी स्तुती केली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, उपाध्यक्ष हेमंत आराध्ये, सुरेश जरग, अमोल पालोजी, नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील,अनिश पोतदार, रणजीत काकडे, शाम जोशी, केशव स्वामी, बाबुराव ठाणेकर, सुनिल जोशी, कपिल धर्माधिकारी, मयुर पाटील, सिकंदर बानगे, प्रसाद लाटकर, विक्रम मोरे, अनिल देशपांडे, अरूण जाधव उपस्थित होते.