शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

Kolhapur- महापूर निवारण आराखडा: रेड झोनमधील बांधकामांना चाप लावण्याची गरज

By भारत चव्हाण | Published: August 08, 2024 12:17 PM

महापालिकेने बघ्याची भूमिका सोडावी : वेळीच शहाणे झालो नाही तर शहर बुडण्याचा धोका

भारत चव्हाणकोल्हापूर : निसर्गाच्या बाबतीत चुका झाल्या तर त्याची शिक्षा किती वर्षे भोगायची? त्यावर काही उपाय आहेत की नाही? पुढील काळात सुद्धा याच चुका पुन्हा पुन्हा भोगतच राहायचे का? त्यातून काही मार्ग काढला जाणार आहे की नाही? हे प्रश्न आहेत कोल्हापूर शहरातील रेड झोनमधील नागरिकांचे! या प्रश्नांवर प्रशासन आणि राज्य सरकारसमोर किमान आज तरी काही उत्तर नाही. परंतु भविष्यकाळात काहीच उपाययोजना केल्या नाहीत आणि ‘रेड झोन’वर अशीच अतिक्रमणे करीत राहिलो तर एकवेळ अख्खं कोल्हापूर महापुराच्या पाण्यात बुडण्याचा धोका नक्कीच आहे.

भविष्यातील ही भयावह स्थिती फार लांब राहिलेली नाही. कारण कोल्हापूरकरांनी गेल्या पंचवीस वर्षांत ज्या चुका केल्या, त्याचे दुष्परिणाम २००५, २०१९ व २०२१ साली भोगून सुद्धा त्यातून काहीच शहाणपण शिकलो नाही. दीर्घ मुदतीच्या उपाययोजना करण्याचे सोडून तात्पुरती मलमपट्टी करून पुन्हा पुन्हा त्याच चुका करीत आहोत. एक दिवस हाच महापूर आपणाला गिळायला उठणार आहे याची जाणीव ना नागरिकांना आहे, ना अधिकाऱ्यांना! संकट काय, येतच राहणार आहेत, महापूर काय वर्षाला येतोय का? अशीच सगळ्याची भावना आहे.सन २०१९ आणि २०२१ मधील महापूर इतिहासातील सर्वांत मोठे महापूर होते. २०१९ मध्ये पंचगंगा नदीची पाण्याची पातळी होती ५५ फूट ७ इंच आणि २०२१ साली आलेल्या महापुरावेळी नदीची पातळी ५६ फूट ३ इंच होती. महापुराचा फटका कोल्हापूर शहरासह नदीच्या वरील बाजूस असणाऱ्या गावातील जवळपास १८ हजारांहून अधिक मिळकतींना बसला होता. यावरूनच भविष्यातील महापुराचे संकट किती गंभीर असेल याचा अंदाज येईल. त्यामुळे पुढील काळात गंभीरपणे विचार करून कठोर उपाययोजना राबविण्याची आवश्यकता आहे.

काय करायला पाहिजेत उपाययोजना ?

  • शिरोली पूल ते सांगली फाटा यादरम्यान भराव टाकून जो बंधारा टाईप राष्ट्रीय महामार्ग करण्यात आला आहे, त्याठिकाणी पिलर उभे करून उड्डाणपुलासारखा रस्ता करायला पाहिजे. खालून पाणी जाण्यासाठी गाळे तयार करायला पाहिजेत. त्याठिकाणी महापुराचे पाणी अडणार नाही याची दक्षता घ्यायला पाहिजे.
  • पंचगंगा नदी काठापासून ब्ल्यू लाईनपर्यंत कोणत्याही प्रकारच्या बांधकामांना परवानगी देऊ नये. दुरुस्तीसह पुनर्विकास तर अजिबातच नको. रेड झोनची काटेकाेर अंमलबजावणी करायला पाहिजे.
  • ब्ल्यू लाईन ते रेड लाईन या अंतरात काही अटींवर बांधकाम परवानगी दिली जाते, त्या अटी सध्याच्या काळात व्यवहार्य आहेत का याचे पुनरावलोकन करण्यात यावे. काही अटींवर परवानगी म्हणजे संकट अधिक गंभीर करण्याचा प्रयत्न ठरू शकतो.
  • ब्ल्यू व रेड लाईनमधील विनापरवाना बांधकामांचे सर्वेक्षण करून ती तोडण्याचा प्रयत्न झाला पाहिजे.
  • शिवाजी पूल ते शिरोली पूल यादरम्यानच्या अंतरात नदीची खोली वाढविण्याचा, काठावरील माती उपसण्याचा निर्णय व्हायला पाहिजे. तेथे कोणी भराव, खरमाती टाकले असतील तर ते काढले पाहिजेत.
  • शहरातील जयंती नाल्याचे शक्य तेथे रुंदीकरण, खोलीकरण केले पाहिजे.

कोल्हापुरातील पूरबाधित मिळकती

  • २०२१ मधील महापुरात करवीर तालुक्यातील १८ हजार ००५ मिळकती बाधित झाल्या, त्यामध्ये कोल्हापूर शहरातील १२ हजार ४२० मिळकतींचा समावेश.
  • बाधित मिळकतींना प्रत्येकी १० हजार रुपयांप्रमाणे १८ कोटींचे सानुग्रह अनुदान वाटप.
  • २०२४ मधील महापुरात शहरातील १५९२ मिळकती बाधित झाल्या असून, अजून पंचनामे सुरूच आहेत. हा आकडा २५०० मिळकतींपर्यंत जाण्याची शक्यता.
  • यावर्षी महापुराची तीव्रता कमी असूनही शहरातील २८० कुटुंबातील १०९९ व्यक्तींना स्थलांतर करावे लागले.

अंमलबजावणी नाहीच..२०२१ मधील महापुराची पाहणी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोल्हापूरला आले होते. तेंव्हा शाहूपुरी कुंभार गल्लीतील रहिवाशांना जादा चटईक्षेत्र मंजूर करण्यात येईल, असे सांगितले होते. पण त्यावर पुढे काहीच विचार झाला नाही.अकोळकर आठवणमहापूर आला की माजी नगरसेवक स्व. के. आर. अकोळकर यांची आठवण होते. महापालिका सभागृहात भाकपचे नगरसेवक असलेल्या अकोळकर यांनी वारंवार सभागृहात विषय उपस्थित करून रेड झोन परिसरात बांधकामांना अजिबात परवानगी देऊ नये, असा आग्रह धरला. परंतु बिल्डर धार्जिण्या नगरसेवक व अधिकाऱ्यांनी त्यांचे ऐकले नाही. आज त्याच्याच झळा बसत आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfloodपूर