कसबा सांगाव : शासनाने ग्राहकांच्या हितासाठी अनेक कायदे पारीत केले आहेत. जन्मापासून स्मशानभूमीपर्यंत मनुष्य हा ग्राहक असतो. त्यामुळे ग्राहक म्हणून फसवणूक झाल्यास त्या विरोधात दाद मागण्यासाठी जिल्हा ग्राहक आयोगाचा आधार घ्यावा. त्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे पदाधिकारी व कार्यकर्ते तुम्हाला मदत करतील असे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अरुण यादव यांनी केले.
१५ मार्च जागतिक ग्राहक दिनानिमित्त डी.आर.माने महाविद्यालयाच्या वतीने आयोजित ‘जागो ग्राहक जागो’ या कार्यकमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुरवठा विभागाच्या नायब तहसीलदार वैशाली निकम होत्या.
यावेळी बोलताना यादव यांनी ऑनलाईन फसवणूक,चुकीच्या पद्धतीने प्रसारित जाहिराती,त्यामध्ये असणारे सेलिब्रेटी,एमआरपी,होलसेल,किरकोळ खरेदी फसवणूक याबाबत कशा प्रकारे दाद मागायची याबाबत मार्गदर्शन केले.
भास्कर चंदनशिवे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा सचिव तानाजी पाटील, कागल तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिकोडे, तालुका संघटक विठ्ठल भोपळे, सुप्रिया गुदले, तालुका सचिव श्रीकांत पाटील, कागल शहराध्यक्ष बाबूराव पुंडे, सुषमा पाटील, गगनबावडा तालुका अध्यक्ष विश्वनाथ पोतदार, संयोगिता देसाई आदी उपस्थित होते. आर.बी.नढाळे आणि त्यांच्या सहकारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
फोटो कॅप्शन : डी. आर. माने महाविद्यालय कागल यांच्या वतीने आयोजित जागतिक ग्राहक दिन कार्यक्रमात बोलताना अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा अध्यक्ष अरुण यादव,व्यासपीठावर नायब तहसीलदार वैशाली निकम, जिल्हा सचिव तानाजी पाटील, तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिकोडे, तालुका संघटक विठ्ठल भोपळे,प्रा. आर. बी.नढाळे आदी.मान्यवर