गारगोटी शहरात पस्तीस हजार लोक राहतात. या शहराला गारगोटी ग्रामपंचायत पाणीपुरवठा करते. ग्रामपंचायतीकडे पाणी शुद्धीकरण करण्याची कोणतीही सुविधा नसल्याने नदीतून उपसा केलेले पाणी सरळ लोकांच्या घरी पोचते. त्यामुळे लोकांना नाइलाजाने नळातून आलेले पाणी प्यावे लागते. या दूषित पाण्याचा वृद्ध आणि लहान मुलांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे. तरी या पाण्याचा पुरवठा त्वरित थांबवावा, अशा आशयाचे निवेदन लोकनियुक्त सरपंच संदेश भोपळे यांना देण्यात आले आहे.
निवेदनावर माजी उपसरपंच अरुण शिंदे, ग्रा.पं. सदस्य रणधीर शिंदे, अजित चौगले, गजानन मोरे, साताप्पा बोटे, सुनील जाधव, शरद साठे, सूरज शिंदे, अजित सोरटे, धीरज बोटे, शैलेश शिंदे, प्रसाद शिंदे यांच्यासह अनेक नागरिकांच्या सह्या आहेत.