तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : एस.टी. बस, वडाप, खासगी आरामबस, रिक्षा यांची प्रवासी उचल करण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी लागलेली जीवघेणी स्पर्धा, यातच उच्चभू्र हॉटेल, रेल्वेस्थानक, मध्यवर्ती बसस्थानक यांसह ताराबाई पार्क, शिवाजी पार्क, शाहूपुरी, राजारामपुरी येथून येणारे प्रमुख रस्ते जोडल्याने स्टेशन रोडवर वाहतुकीचा प्रचंड ताण पडत आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीच्या कोंडीत अडकला आहे.कोल्हापूर शहरातील वाहतुकीचा प्रचंड ताण स्टेशन रोडवर पडलेला दिसतो. वडाप वाहतुकीने तर हा रस्ताच गिळंकृत केला आहे, म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. ताराराणी चौक ते दसरा चौक हा सुमारे दोन किलोमीटरचा हा शहरातील प्रमुख रस्ता होय; पण या रस्त्यावरून वाहतुकीनेच नव्हे, तर पायी प्रवास करणे म्हणजे जीवघेणं झालेलं आहे.कोल्हापूर शहराचं प्रवेशद्वार तावडे हॉटेलनजीक असले तरी छत्रपती ताराराणी पुतळ्यापासून या शहराच्या खºया प्रवेशालाच प्रारंभ होतो. या स्टेशन रोडवर उच्चभ्रू हॉटेल, विविध व्यावसायिक, रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक असल्याने या रस्त्यावरसातत्याने वर्दळ ठरलेलीच. या मार्गाला दिवसभरात लहान-मोठ्या वाहनांसह अवजड वाहनांचाप्रचंड भार सोसावा लागतआहे.पदपथाचा उपयोग पादचाºयांसाठी हवाया स्टेशन रोडवर फक्त गोकुळ हॉटेल ते रेल्वे स्थानक तसेच राजीव गांधी पुतळा ते ताराराणी चौक या दरम्यानच दोन्हीही बाजूंना फुटपाथ आहे; पण त्या फुटपाथपैकी बराचसा भाग हा अस्वच्छ असल्याने त्यावरून पादचाºयांना चालणेही मुश्कील झाले आहे. फक्त राजीव गांधी पुतळा ते ताराराणी चौकापर्यंतच फुटपाथ हे पादचाºयांना वापरण्यास योग्य असल्याने स्वच्छतेवरून दिसून येते. अन्यथा हा रस्ता पादचाºयांसाठी जीवघेणाच ठरतोय.जोडणाºया प्रमुखरस्त्यांमुळे कोंडीदसरा चौक ते ताराराणी पुतळा या मार्गाच्या उत्तरेकडून कसबा बावडा मार्ग, असेंब्ली रोड, ट्रेड सेंटर, सासने मैदान परिसर मार्ग, पर्ल हॉटेल मार्ग, धैर्यप्रसाद कार्यालयाकडून येणारा मार्ग, तसेच दक्षिणेकडून लक्ष्मीपुरी, गोकुळ हॉटेल चौक, मध्यवर्ती बसस्थानक मार्ग, शिवाजी पार्क, तसेच टेंबलाई रेल्वे फाटक मार्ग, आदी लहान-मोठे रस्ते जोडले जात असल्याने या प्रमुख मार्गांवरील सर्व वाहतूकया स्टेशन रोडवर येत असल्याने यावरील वाहतुकीची कोंडी नित्याचीच बनली आहे.दाभोळकर चौकातील कोंडी फोडणे आवश्यकदाभोळकर चौकात काही अंतरावर असणाºया मध्यवर्ती बसस्थानकामधून सुटणाºया बसेस या दाभोळकर चौकातून स्टेशन रोडमार्गे महामार्गाकडे मार्गस्थ होतात; पण तत्पूर्वी दाभोळकर चौकात पादचारी पुलाखाली असणाºया केएमटी बस थांब्यावर केएमटी बस थांबलेली असते. त्या बसपुढे रस्त्यातच रिक्षा उभ्या करून वडापवाले आपले व्यवसाय सुरू ठेवून उभे असतात. त्यामुळे या ठिकाणी प्रामुख्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. त्यातच या चौकातील सिग्नल सुटल्यानंतर वेगाने येणारी वाहने या प्रवाशांच्या गर्दीवर आदळण्याची शक्यता आहे; त्यामुळे येथे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.खासगी आरामबस वाहतुकीचा अडथळामध्यवर्ती बसस्थानक चौकात खासगी आरामबस वाहतुकीला प्रवासी घेण्यासाठी थांबण्यास प्रतिबंध असला तरीही दिवसभर आणि रात्री या ठिकाणी प्रवासी घेण्यासाठी अनेक खासगी आरामबसेस थांबलेल्या असतात. याशिवाय ट्रेड सेंटर, दाभोळकर चौक, हॉटेल पंचशीलसमोर या आरामबसेस प्रवाशांच्या प्रतीक्षेसाठी उभ्या असल्याने त्याचा या स्टेशन रोडवरील वाहतुकीलाही प्रचंड अडथळा होतो. रात्रीच्या वेळी तर काही आरामबस चालक रस्त्यातच बसेस उभ्या करून वाहतुकीची कोंडी निर्माण करीत असतात.कोकणच्या वाहतुकीचा ताणराष्टÑीय व राज्य महामार्ग या स्टेशन रोडला जोडत आहेत. त्यामुळे पुणे-बंगलोर मार्गावरील कोकणात जाणारी संपूर्ण वाहतूकही तावडे हॉटेल येथून या मार्गावरून शहरात येऊन ती दसरा चौकातून गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या मार्गाकडे विभागली जाते. त्यामुळे कोकणाकडे जाणाºया वाहतुकीचाही प्रचंड ताण या रस्त्यावर येतो. त्यामुळे या वाहतुकीत अवजड वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.वडाप, रिक्षा वाहतुकीमुळे कोंडीया स्टेशन रोडवर वडाप (अवैध प्रवाशी) वाहतुकीमुळे खरी वाहतुकीची कोंडी होते. या मार्गावर अस्ताव्यस्त उभ्या केलेल्या रिक्षा, सहा आसनी रिक्षा यांमुळे या मार्गावरील वाहतूकविस्कळीत होते. त्या वडाप वाहतुकीला चाप लावणे गरजेचे बनले आहे. या रिक्षा रिकाम्या असल्यास इतर प्रवासी वाहतुकीला त्या पुढे सोडत नसल्याने मागील वाहतुकीच्या रांगा लागून वाहतुकीच्या कोंडीत भर पडत आहे.
कोंडमाºयात अडकलाय... स्टेशन रोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 12:58 AM