कोल्हापूर : केंद्रीय अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीनंतर दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना मोफत गॅस कनेक्शन देण्याच्या योजनेचा शुभारंभ १ मे रोजी देशपातळीवर होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा पुरवठा प्रशासनाने जिल्ह्यात किती दारिद्र्यरेषेखालील कुटुुंबांकडे गॅस कनेक्शन आहे याची माहिती संकलनाचे काम सुरू आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसंबंधी अद्याप तपशीलवार आदेश आलेले नाहीत. आदेश आल्यानंतर योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन जोरदार तयारीला लागले आहे. चुलीच्या धुरामुळे आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांतील प्रमुख महिलेच्या नावे एलपीजी गॅस कनेक्शन देण्याची ही योजना आहे. जिल्ह्यात एक लाख ४७ हजार ८३७ दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे आहेत. त्यातील किती कुटुंबांनी विना ठेव गॅस कनेक्शन योजनेचा लाभ घेतला आहे. त्याची माहिती घेतली जात आहे. नव्या योजनेच्या अंमलबजावणीचे मार्गदर्शन सूचना आल्यानंतर सध्या दारिद्र्यरेषेखाली कुटुंबांना विना ठेव गॅस कनेक्शन देण्याच्या योजनेलाही व्यापकता येणार आहे.
मोफत गॅस योजनेसाठी माहिती संकलन सुरू
By admin | Published: April 26, 2016 12:16 AM