विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्यावतीने साजरा केल्या जाणाऱ्या ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा-२०२१’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील प्रमुख उपस्थित होते. यंदा लेखक-संवाद या अभिनव उपक्रमातून डॉ. राजन गवस, अनिल मेहता, महादेव मोरे, मोहन पाटील, आदी दिग्गजांशी संवाद साधण्यात येणार आहे. या निमित्ताने नव्या-जुन्या लेखक प्रकाशकांचे हृद्गत श्रोत्यांसमोर उलगडले जाईल. त्यांच्या अभिव्यक्तीच्या प्रेरणा, जाणिवा यांची माहिती होईल. त्याचप्रमाणे ‘स्मरण अरुण कोल्हटकरांचे...’ या चर्चासत्रांतर्गत अरुण कोल्हटकरांचे साहित्य, व्यक्तिमत्त्व यांची विविधांगांनी माहिती लोकांसमोर येईल. अशा पद्धतीने वेळोवेळी विविध साहित्यिक, कवींच्या साहित्याच्या अनुषंगाने चर्चासत्रे आयोजित करण्याची गरज असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. यावेळी डॉ. अक्षय सरवदे, अवनिश पाटील, मेघा पानसरे, गोविंद काजरेकर, उदयसिंह राजेयादव, आदी उपस्थित होते. मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत केले. सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी आभार मानले.
चौकट
साहित्यिकांचे कायमस्वरूपी चित्र प्रदर्शन
मराठी अधिविभागामध्ये स्थापित साहित्यिकांच्या कायमस्वरूपी चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले. ही चित्रे रेखाटणारे चित्रकार सुधीर गुरव यांचा सत्कार करण्यात आला.
फोटो (१४०१२०२१-कोल-मराठी भाषा कार्यक्रम) : कोल्हापुरात गुरुवारी मराठी भाषा संवर्धन पंधरवडाच्या उद्घाटनप्रसंगी शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागामध्ये चित्रकार सुधीर गुरव यांचा सत्कार कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आला.