शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

कंत्राटी वीज कामगारांचे आंदोलन कायम

By admin | Published: May 24, 2017 12:39 AM

विविध संघटनांचा पाठिंबा : ‘बेमुदत काम बंद’ चा दुसरा दिवस

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी कंत्राटी वीज कामगारांचे ‘बेमुदत काम बंद’ आंदोलन मंगळवारी कायम राहिले. दिवसभरात विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन या कामगारांच्या लढ्याला पाठिंबा दिला.राज्यातील कंत्राटी वीज कामगारांनी केलेल्या विविध मागण्या शासनदरबारी प्रलंबित आहेत. यामध्ये रानडे समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करावी, कंत्राटी पद्धत बंद करावी, रोजंदारी कामगार पद्धती पुन्हा राबवावी, कामावरून कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना विनाविलंब कामावर घ्यावे, आदी मागण्यांचा समावेश आहे. त्याकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र कंत्राटी वीज कामगार संघाने बेमुदत काम बंद आंदोलन सोमवार (दि. २२) पासून सुरू केले. यात जिल्ह्यातील सुमारे पाचशे वीज कंत्राटी कामगार सहभागी झाले आहेत. त्यांनी ताराबाई पार्क येथील ‘महावितरण’च्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर ठिय्या मारला आहे. त्यांचे आंदोलन मंगळवारी कायम राहिले. त्यांनी या ठिकाणी मागण्यांच्या अनुषंगाने घोषणा देत निदर्शने केली. भारतीय मजूर संघाचे केंद्रीय सदस्य रमेश थोरात, विष्णू जोशीलकर, भारतीय वीज कामगार संस्थेचे एकनाथ जाधव, वर्कर्स फेडरेशनचे कृष्णात तांबेकर, शकील महात, संदीप बच्चे, सर्जेराव विभूते, आदींनी आंदोलनस्थळी भेट देऊन या कामगारांच्या लढ्याला पाठिंबा दिला आहे, अशी माहिती संघाचे जिल्हा सचिव लोहार यांनी दिली.कामकाज कोलमडलेसंघाने पुकारलेल्या आंदोलनात सुमारे पाचशे कामगार सहभागी झाल्याने जिल्ह्यातील महापारेषण, महावितरणच्या विद्युतवाहिन्यांची दुरुस्ती, बिलांचे वितरण आणि वसुली, असे विविध स्वरूपांतील कामकाज कोलमडले असल्याचे संघाचे जिल्हा सचिव लोहार यांनी सांगितले.यासाठी आंदोलनाचा निर्णयतिन्ही वीज कंपन्यांमध्ये ३२ हजार कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांना सेवाज्येष्ठतेप्रमाणे कायम कामगार म्हणून सामावून घ्यावे. रोजगाराची हमी मिळावी, आदींपैकी एकही मागणी व्यवस्थापनाने मान्य केली नाही; त्यामुळे हे आंदोलन करावे लागले असल्याची माहिती कंत्राटी आऊटसोर्सिंग कामगार संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी दिली.