कुंभोज जिल्हा परिषद संघाचे प्रतिनिधित्व करीत असताना मतदारसंघातील अनेक मूलभूत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कसोशीने प्रयत्न केले. जिल्हा परिषदेतील कारकिर्दीत पाटील यांनी अनेक व्यक्तिगत लाभाच्या योजना प्रभावीपणे राबवून सर्वसामान्य नागरिकांत कामाचा ठसा उमटविला.
वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी हिताच्या धोरणास प्राधान्य दिले. आमदार महादेवराव महाडिक यांनी दिलेल्या संधी सोने करून त्यांचा विश्वास सार्थ ठरवला.
समाजकारण करीत राजकारण आणि संस्कारात कामाची छबी निर्माण करून पाटील बाहुबली येथील शैक्षणिक प्रगतीतही योगदान देत आहेत. दलितमित्र जि. प. सदस्य अशोकराव माने यांच्यासोबत हातकणंगले तालुक्यात जनसुराज्य पक्ष मजबुतीसह अनेक सामाजिक उपक्रमात ते सक्रिय असून संघटन कौशल्य, धडाडीचे नेतृत्वगुण यामुळे पाटील यांनी आपले राजकीय स्थान अढळ ठेवून लोकप्रियताही जपली आहे. वडील माजी जि. प. सदस्य बाबासाहेब पाटील यांनी राजकारणाचे धडे घेत प्रत्येक ठिकाणच्या नेतृत्वास न्याय देऊन लोकसंपर्क वाढविला आहे.
-अशोक खाडे, कुंभोज वार्ताहर