कोल्हापूर : कोल्हापूरकरांना यंदाच्या दिवाळीतील पहिली आंघोळ काळम्मावाडीच्या थेट पाईपलाईनच्या पाण्याने घालण्याचे वचन मी दिले होते, परंतु आणखी एक वर्ष काम पूर्ण होण्यास लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीला काळम्मावाडीचे पाणी देऊ शकणार नाही, याबद्दल कोल्हापूकरांची मी जाहीर माफी मागतो, असे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी मुश्रीफ कबुली दिली
कोल्हापूरकरांचे स्वप्न असलेली थेट पाईपलाईन योजना तांत्रिक अडचणींसह कोरोनाचा कहर, वन विभागाकडून ना हरकत मिळण्यास झालेला विलंब आणि ठेकेदाराच्या चुकांमुळे रेंगाळली असल्याची कबुली ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. आता मात्र ३१ मार्च २०२२ पर्यंत ही योजना पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.
योजनेसाठी निधी उपलब्ध झाला. २७ डिसेंबर २०१३ रोजी योजनेला मान्यता मिळाली. परंतु वन विभागाच्या परवानगी मिळण्यास विलंब झाला. २०१९ मधील अतिवृष्टी, मार्च २०२० पासून सुरू झालेला कोरोनाचा कहर, काम करताना आलेल्या तांत्रिक अडचणी, ठेकेदारांच्या चुका अशा विविध कारणांनी हे काम रेंगाळले. त्यामुळे आणखी एक वर्ष हे काम चालणार आहे.बैठकीस जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रशासक कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, जलअभियंता (प्रकल्प) हर्षजित घाटगे यांच्यासह आर. के. पोवार, माजी महापौर निलोफर आजरेकर, राजेश लाटकर, आदिल फरास, शारंगधर देशमुख, संदीप कवाळे, सचिन पाटील उपस्थित होते.