शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

शाहू जन्मस्थळाच्या कामाला मिळेना ठेकेदार-- वादाचा परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2017 1:24 AM

कोल्हापूर : पुरातत्त्व खात्याच्या अटींचे बंधन आणि प्रकल्पाला लागलेली वादाची किनार यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या वस्तुसंग्रहालयाच्या कामांसाठी ठेकेदार मिळेना, अशी अवस्था

ठळक मुद्दे: पुरातत्त्व खात्याच्यावतीनेच काम करण्याचा प्रस्ताव

इंदूमती गणेश।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : पुरातत्त्व खात्याच्या अटींचे बंधन आणि प्रकल्पाला लागलेली वादाची किनार यामुळे राजर्षी शाहू महाराजांच्या जन्मस्थळाच्या वस्तुसंग्रहालयाच्या कामांसाठी ठेकेदार मिळेना, अशी अवस्था झाली आहे. तीनवेळा निविदा प्रसिद्ध करूनही ठेकेदारांचे अर्ज न आल्याने अखेर पुरातत्त्व खात्याच्यावतीने संग्रहालयाचे काम करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला आहे.कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळाच्या विकासाचे काम सन २०११ मध्ये सुरू झाले. येथे साकारण्यात येणाºया संग्रहालयासाठी इतिहास संशोधकांच्या मंडळाने१५ कोटींच्या आराखडा तयार केला. त्यातील पहिल्या टप्प्यासाठीदोन कोटींची रक्कम तातडीने वर्गही करण्यात आली. हा निधी संग्रहालयासाठीच्या ‘राखीव निधी’तून देण्यात आला आहे.वर्ग झालेल्या दोन कोटींत संग्रहालयाचे प्राथमिक काम करण्यात येणार आहे. शाहूंच्या जीवनातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित प्रसंग म्युरल्सच्या माध्यमातून दाखविण्यात येणार आहेत. चित्र-शिल्प बनविण्यासाठी कलाकारांकडून आधी क्ले मॉडेल्स करून घ्यावी लागणार आहेत. या कामाचा ठेका देण्यासाठी पुरातत्त्व खात्याच्यावतीने तीनवेळा निविदा प्रसिद्ध करण्यात आली आणि दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र, केवळ एका ठेकेदाराने या कामाची निविदा भरली आहे. शासनाच्या नियमानुसार किमान तीनजणांनी अर्ज करणे गरजेचे असते. सुरुवातीला शासकीय अनास्था, नंतर ठेकेदाराची दिरंगाई, चुकीच्या पद्धतीने झालेले काम आणि त्यावर शाहू जन्मस्थळ समितीने केलेली उघड टीका या सगळ्या वादाची किनार या प्रकल्पाला लागल्याने ठेकेदार हे काम करण्यासाठी पुढे येत नाहीत. समितीच्या सदस्यांशी चर्चा करून कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाचे सहायक अधिरक्षक अमृत पाटील यांनी पुरातत्त्व खात्याच्यावतीने हे काम करण्यात यावे, असा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे.पर्याय खुल्या निविदेचा...प्राचीन वास्तूंच्या विकासाचे काम वेगळ्या पद्धतीने आणि त्यांचे प्राचीनत्व जपत करावे लागते, त्यामुळे अशा वास्तूंच्या कामाचा अनुभव असलेल्या ठेकेदारांनाच हे काम दिले जाते किंबहुना तशी अटच असते. अशा प्राचीन वास्तूंचे काम करणारे अनेक ठेकेदार असले तरी शाहू जन्मस्थळसाठी कोणी तयारी दर्शवलेली नाही. अमृत पाटील यांनी यापूर्वी कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाचे काम केले आहे. त्यामुळे हे कामही खात्याच्यावतीने करण्याचा विचार करण्यात आला आहे, तर दुसरीकडे खुल्या निविदा प्रक्रियेमुळे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने वास्तूचे प्राचीनत्व खुलवता येत असेल तर त्याचाही विचार व्हावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. 

शाहू जनमस्थळाच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी तीनवेळा निविदा प्रसिद्ध करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही, शिवाय हे काम ठेकेदाराला दिले तरी त्यावर पुरातत्त्व खात्यालाच मॉनिटरिंगचे काम करावे लागणार आहे. त्यामुळे टाऊन हॉलप्रमाणे खात्याकडूनच हे काम केले जावे, असा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यास मंजुरी मिळाली की तातडीने कामाला सुरुवात होईल.- अमृत पाटील (सहा. अभिरक्षक कोल्हापूर वस्तुसंग्रहालय)