शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

कोल्हापुरात कंत्राटी एसटी चालकांचे भीक मांगो आंदोलन, १६ जिल्ह्यांतील कामगारांचा सहभाग

By संदीप आडनाईक | Published: November 10, 2023 5:12 PM

उपोषणाचा चौथा दिवस, अन्नपाण्याविना एकाची प्रकृती गंभीर

कोल्हापूर : एसटी संप काळात तसेच कोरोना काळात कंत्राटी कामगार म्हणून एसटी महामंडळात सेवा केलेल्या आणि सध्या सेवेतून कमी केलेल्या कंत्राटी कामगारांना एसटी महामंडळाच्या सेवेत घ्यावे, या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी चौथ्या दिवशीही उपोषण केले. पालकमंत्री आणि लोकप्रतिनिधींनी या आंदोलनाची दखल घेतली नसल्याने शुक्रवारी त्यांनी भीक मांगो आंदोलन केले.कोल्हापूरसह राज्यातील १६ जिल्ह्यांतील सुमारे २५० हून अधिक कंत्राटी कामगार या आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्य शासन आणि लोकप्रतिनिधींकडून या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने या कामगारांनी भीक मांगो आंदोलन केले. दरम्यान, मंगळवारपासून बेमुदत उपोषणास बसलेले महे ता. करवीर येथील कंत्राटी कामगार गिरीश हुजरे-पाटील यांची अन्नपाण्याविना प्रकृती बिघडल्यामुळे ते मांडवातच झोपून आहेत.एसटी महामंडळाचे राज्य शासनाच्या सेवेत विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी गेल्या वर्षी एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला होता. याकाळात एसटी सेवा सहा महिने ठप्प होती. त्याकाळात महामंडळाने कंत्राटी तत्त्वावर चालक वाहकांची नियुक्ती केली. सहा महिन्यांनंतर संप मिटल्यानंतर या कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले. त्यांना सरकारने कायमस्वरुपी सेवेत घेण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ती बोलाचीच कढी ठरली. दरम्यान शासनाने विविध रिक्त पदांवर पुन्हा भरती प्रक्रिया सुरु केली, पण या कर्मचाऱ्यांना सामाउन घेतले नाही. संपकाळात कंत्राटींनी दिलेली सेवा विचारात घेऊन कंत्राटींना पुन्हा कामावर घ्यावे, नोकरीत कायम करू नका पण सेवेत वेतन व अन्य पूरक लाभ मिळाल्यास जगण्याला हातभार लागेल, अशी अपेक्षा हे कंत्राटी कामगार करीत आहेत.शासनाची उदासीनता पाहून विविध प्रकारच्या लोकशाही मार्गाने न्याय्य हक्काचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला, तोंडी आणि लेखी निवेदनेही दिली. त्यानंतर मुंबईत आझाद मैदानात बेमुदत उपोषण केले. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात २८ डिसेंबर रोजी आक्रोश मोर्चानंतर सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन देउन सरकारने वेळ मारुन नेली. आता सहनशीलता संपल्याने कोल्हापुरात या कर्मचाऱ्यांनी उपोषण सुरू केले. ॲड. संतोष मळवीकर, मंगेश वडर, प्रवीण टपरे, विजय गुरव, विजय भोयर, त्रिगुण पवार, विकास जाधव, प्रकाश शिंदे आदी उपोषणात सहभागी झाले आहेत.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर