शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

शाहू समाधी स्मारकस्थळावर वादाची ठिणगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2019 5:22 PM

नर्सरी बागेत होत असलेल्या राजर्षी शाहू समाधी स्मारकासंबंधी काही मागण्या घेऊन गेलेल्या सिद्धार्थनगरातील नागरिकांपैकी एकाने ‘सगळा चोर कारभार आहे’ अशा शब्दांत महापौर तसेच अधिकाऱ्यांचा अपमान केल्यामुळे महापौर सरिता मोरे व त्यांचे पती नंदकुमार मोरे संतप्त व आक्रमक झाले. ज्याने असे अनुद्गार काढले त्यास त्यांनी चांगलेच खडसावत शब्द मागे घेण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी दिवशी आणि त्यांच्याच नियोजित स्मारकाच्या परिसरात हा दुर्दैवी प्रकार घडला. दरम्यान, या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करीत, लागलीच पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला.

ठळक मुद्देशाहू समाधी स्मारकस्थळावर वादाची ठिणगीसगळा चोर कारभार-आरोप : नंदकुमार मोरे आक्रमक

कोल्हापूर : नर्सरी बागेत होत असलेल्या राजर्षी शाहू समाधी स्मारकासंबंधी काही मागण्या घेऊन गेलेल्या सिद्धार्थनगरातील नागरिकांपैकी एकाने ‘सगळा चोर कारभार आहे’ अशा शब्दांत महापौर तसेच अधिकाऱ्यांचा अपमान केल्यामुळे महापौर सरिता मोरे व त्यांचे पती नंदकुमार मोरे संतप्त व आक्रमक झाले.

ज्याने असे अनुद्गार काढले त्यास त्यांनी चांगलेच खडसावत शब्द मागे घेण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी दिवशी आणि त्यांच्याच नियोजित स्मारकाच्या परिसरात हा दुर्दैवी प्रकार घडला. दरम्यान, या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करीत, लागलीच पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला.महापौर सरिता मोरे व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी सोमवारी राजर्षी शाहू समाधी स्मारकाच्या कामाची पाहणी करण्यास, तसेच पुण्यतिथी निमित्त आदरांजली वाहण्याकरिता जाण्याचे ठरले होते. त्यानुसार महापौर मोरे या स्मारक परिसरात पोहोचल्या. आयुक्त मात्र अचानक बाहेरगावी गेल्याने अनुपस्थित राहण्याबाबत परवानगी घेतली होती.

महापौरांसह त्यांचे पती नंदकुमार मोरे, उपमहापौर भूपाल शेटे, शिक्षण सभापती अशोक जाधव, माजी महापौर हसिना फरास, आदिल फरास, नगरसेविका मेहजबीन सुभेदार, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, उपशहर अभियंता एस. के. माने यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर