प्रकाश पाटीलकोपार्डे : कोल्हापूर गगनबावडा मार्गावर असणाऱ्या बालिंगा तेथील १८८५ मध्ये बांधलेला रिव्हज पूल धोकादायक असल्याचे कारण सांगून मंगळवारी दि.२६ पासून बंद केला. मात्र, दोन-तीन वर्षापूर्वी या पुलाचे मजबुतीकरण केले असून, तो आता धोकादायक झाला कसा असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे.पुलाच्या सर्व पीलरचे बेंगलोरच्या कंपनीकडून २०१९ मध्ये वॉटर इन्सपेक्शन करण्यात आले. यात मध्यभागी असणाऱ्या नदीपात्रातील पिलरच्या पाया भोवतीचे दगड निखळल्याचे लक्षात आल्यानंतर पाया मजबूत करण्यासाठी कामाची निविदा काढली होती. चिपळूणच्या प्रभू इंजिनिअरिंग कंपनीने या कामाचा ठेका घेतला होता. त्यांनी मुंबई येथील वसंत धडके या उपठेकेदाराला हे काम दिले होते. ४६ लाखाचे हे काम होते. या कामासाठी पिलरच्या भोवती मुरुम, दगड,मातीचा २५ ते २७ फूट पूलाच्या पुर्वेकडील पिलर भोवती भराव टाकण्यात आले.पुलाचे काम करताना अंडर वॉटर सिस्टीम या अंत्यत उच्च प्रतीचे तंत्रज्ञानाचा वापर करून मायक्रो काँक्रीटीकरण करण्यात आले.या द्वारे पीलरना काँक्रीट जँकेट होणार असल्याने पुराच्या प्रवाहाचा धोका कमी होणार असून पुलाचे आयुष्य वाढणार आहे असे सार्वजनिक बांधकामचे शाखा अभियंता रविंद्र येडगे यांनी सांगितले होते.
स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये पूल मजबूत कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या सात ब्रिटिशकालीन फुलांपैकी बालिंगा येथील रिव्हर्स पूल स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये मजबूत असल्याचे तात्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले होते यानंतरही या फुलाची मजबूत करण्याचे काम झाले होते असे असताना पूल धोकादायक कसा असा प्रश्न जनतेला पडला आहे.दोन वर्षांपूर्वी पुलाच्या मजबुतीकरणाचे काम करूनही पूल धोकादायक कसा?
राष्ट्रीय महामार्ग अनभिज्ञ१८८५ ला हा पूल बांधण्यात आला आहे. या पुलाचे पिलरचे दगड निखळले असण्याची तसेच दोन दगडांमध्ये फटी निर्माण झाल्या असण्याची शक्यता आहे. पुराच्या वेगवान पाण्याचा प्रवाहाचा परिणाम पिलरवर होऊन पुलाला धोका निर्माण होऊ शकतो, असे राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पण, २०१९-२० मध्ये या पुलाच्या पिलरच्या दोन दगडांमधील फटी बुजवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून मायक्रो काँक्रिटीकरण केले आहे. पुलाच्या पायाशी काँक्रीट जॅकेट केले आहे. ही माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतलेली नाही का? पुलाला धोका आहे, अशी भीती निर्माण करून राष्ट्रीय महामार्ग बंद करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बालिंगा पुलाची माहितीनिर्मिती - सन १८८५एकूण गाळे - ५लांबी - १०२.५ मीटररुंदी - १० मीटरबांधकाम वर्ष - १८८५रुंदीकरण - २००५
तालुका -करवीर,राधानगरी, पन्हाळा,शाहूवाडी,तळकोकणात प्रवासी व अवजड माल वाहतूकवाहतूक (दिवसभरात)दुचाकी -८००० ते १०,०००अवजड-१०००कार -४०००प्रवासी वहाने २ ते ४ हजार