फास्टॅगविषयी विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच टोल नाक्यावरही फास्टॅग असणाऱ्या वाहनांसाठी वेगळ्या रांगा व कॅशसाठी वेगळ्या रांगा ठेवल्यामुळे वाहनचालकांचा वेळ वाचण्याबरोबरच इंधनाची बचत होत आहे. टोल नाक्यांवरील गर्दी कमी करण्याचा सोपा उपाय म्हणून फास्टॅगकडे पाहिले जाते; मात्र राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल नाके फास्टॅग करण्याच्या तयारीत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाने १ जानेवारी फास्टॅग सक्तीसाठी निवडली. त्याची पुन्हा १५ फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. किणी टोलनाक्यावर फास्टॅगच्या वाहनांसाठी सहा रांगा व फास्टॅग नसणाऱ्या वाहनांसाठी दोन रांगा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. फास्टॅग नसणारे वाहन फास्टॅगच्या लेनमध्ये आल्यास त्यांच्याकडून दुप्पट टोल वसूल करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आल्यानंतर वाहनधारक व टोल कर्मचारी यांच्यात वादावादी होत होती. उशिरापर्यंत हे प्रकार सुरू होते.
फास्टॅगच्या नियमाने किणी टोलनाक्यावर वादावादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2021 4:25 AM