कोल्हापूर : घरात पाणी गरम करत असताना घरगुती गॅस गळतीमुळे सिलींडरचा स्फोट झाल्याची घटना बुधवारी सकाळी कदमवाडीतील विठ्ल मंदीर गल्लीत घडली.
स्फोटामुळे घराची खिडकीसह दगडमातीची भींत कोसळली. प्रापचिक साह्त्यिाचे मोठे नुकसान झाले. स्फोटाचा मोठा आवाज आल्याने परिसरात खळबळ उडाली. दुर्घटनेत भाजून गंभीर जखमी झालेल्या उषा चौगुले (वय ५१) व विजया चौगुले (५५) यांना तातडीने सांगलीच्या सिव्हील रुग़्णालयात दाखल केले.घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, कदमवाडीतील विठ्ठल गल्लीत धनाजी पाटील यांच्या घरात चौगुले ह्या दोघी भगिणी गेल्या वर्षीपासून भाडेकरु म्हणून एकाच खोलीत राहत होत्या. बुधवारी सकाळी त्यांनी स्वयपाक गॅस वर आंघोळीसाठी पाणी तापत ठेवले. त्यावेळी घराच्या दारे, खिडक्या पूर्णपणे बंद होत्या. त्याचवेळी पाणी उकळून भांड्याबाहेर पडून पेटता गॅस विझला.
दरम्यान, च्या कालावधीत संपूर्ण खोलीत गॅस कोंडून राहील्यामुळे त्याचा स्फोट झाला. या स्फोटात शेजारीत कॉटवर झोपलेल्या दोघीही बहिणी भाजून जखमी झाल्या. स्फोटामुळे दरवाजा, खिडक्या व भिंतीचा प्रमुख भाग पूर्णपणे कोसळला. मोठा आवाज झाल्याने परिसरात घबरहाट पसरली.घरमालक धनाजी पाटील व परिसरातील नागरीकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली, काही वेळातच अग्नीशमक दलाचे बंब घटनास्थळी पोहल्याने त्यांनी आग अटोक्यात आणली. नागरीकांनी चौगुलेच्या नातेवाईकांना बोलवून जखमी दोघींना तातडीने सांगलीच्या सिव्हील रुग़्णालयात उपचारासाठी दाखल केले.प्रापचिक साह्त्यिाचे नुकसानबंद घरात गॅस कोंडल्यानंतर स्फोटात आगीचे लोळ खोलीभर पसरल्याने घरातील कपडयांसह प्रापचिक साहित्य खाक झाले. घरातील भांडी स्फोटामुळे विखुरलेल्या अवस्थेत होती. स्फोटामुळे सुमारे तीन फुट रुंदीच्या भींतीला मोठे भगदाड पडले.