शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

कॉँग्रेसला साथ द्या, देशाची दिशा बदलेल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 1:12 AM

निपाणी : कर्नाटकाने अनेकवेळा देशाला नवी दिशा देण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी कल्याणकारी योजना आखून त्यांची उत्तम पद्धतीने अंमलबजावणी करण्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सरकार आघाडीवर आहे. पुन्हा त्यांनाच मुख्यमंत्री करण्यासाठी कॉँग्रेसला साथ द्या. देशाची राजकीय दिशाच बदलेल, असे आवाहन राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.निपाणीचे ...

निपाणी : कर्नाटकाने अनेकवेळा देशाला नवी दिशा देण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य माणूस, शेतकरी, शेतमजूर यांच्यासाठी कल्याणकारी योजना आखून त्यांची उत्तम पद्धतीने अंमलबजावणी करण्यात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे सरकार आघाडीवर आहे. पुन्हा त्यांनाच मुख्यमंत्री करण्यासाठी कॉँग्रेसला साथ द्या. देशाची राजकीय दिशाच बदलेल, असे आवाहन राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.निपाणीचे माजी आमदार, सहकाररत्न प्रा. सुभाष जोशी यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त समर्थ व्यायाम शाळेच्या पटांगणावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कर्नाटकचे उद्योगमंत्री आर. व्ही. देशपांडे होते.पवार पुढे म्हणाले की, कर्नाटकात सध्या विधानसभेच्या निवडणुका चालू आहेत. त्या पार्श्वभूमीवर हा समारंभ होत आहे. भाजपचे सरकार लोकहिताचे आणि शेतकऱ्यांच्या कल्याणाचे निर्णय घेत नाही. त्यांना सत्तेवरून खाली खेचले पाहिजे. त्यासाठी कर्नाटकातील मतदारांनी दिशा द्यावी. तसा निर्णय घ्यावा. येत्या बारा तारखेला घेऊन भाजपचे बारा वाजवा, हा ‘बारा’मतीकर म्हणून माझे आवाहन आहे. प्रा. जोशी यांच्या कार्याचा गौरव करून ते म्हणाले, सामान्य कुटुंबातील एका शिक्षकाने समाजकल्याण, राजकारण, सहकार आदी क्षेत्रात भव्यदिव्य काम केले आहे. प्रा. जोशी आणि त्यांच्या पत्नी सुनीताताई यांचा सत्कार शरद पवार यांच्याहस्ते शाल, श्रीफळ, पुष्पहार आणि चांदीची तलवार देऊन करण्यात आला.सत्काराला उत्तर देताना प्रा. सुभाष जोशी म्हणाले, सध्याची पिढी सोशर मिडियावर जगत असल्यामुळे त्यांच्यातील संवादच खुंटला आहे. समाजाप्रती असणारी संवेदनशीलता बोथट झाली आहे. आमच्या पिढीने भाई वैद्य, नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्यासोबत चळवळीतून केलेली समाजाची जडणघडण सध्याच्या काळात दिसत नाही.माजी आमदार काकासाहेब पाटील म्हणाले, प्रा. सुभाष जोशी यांच्या गेली पन्नास वर्षांचा संघर्षमय प्रवास येथील कष्टकºयांना ताकद देऊन गेला आहे. असे हे कष्टकºयांचे नेतृत्व आज माझ्या उमेदवारीवर सूचक म्हणून असल्यामुळे सर्वसामान्यांची ताकद माझ्या पाठीशी उभी आहे.यावेळी उद्योगमंत्री आर. व्ही. देशपांडे, खासदार प्रकाश हुक्केरी, आमदार सतीश जारकीहोळी, माजी मंत्री वीरकुमार पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार हसन मुश्रीफ, आमदार जयंत पाटील, निपाणीचे नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर, मोहन बुडके, पप्पू पाटील आदींची भाषणे झाली. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, निवेदिता माने, आमदार संध्याताई कुपेकर, गणेश हुक्केरी, के. पी. पाटील, रावसाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, प्रा. संजय मंडलिक, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, लक्ष्मणराव चिंगळे, गणपतराव पाटील, आदी उपस्थित होते. आभार सुनील पाटील यांनी मानले.एक गुंठा जमीन नसणारे एकमेव अध्यक्षसाखर कारखानदारीचा मी अतिशय जवळून अभ्यास केला आहे. एक गुंठाही जमीन नसणारे प्रा. सुभाष जोशी हे देशातील एकमेव साखर कारखान्याचा अध्यक्ष असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.लाव्हाळा उखडून टाकामागील निवडणुकीत ज्या सुभाष जोशींनी लाव्हाळ्याचे गवत आणले तेच पीक आता त्यांनी उखडून टाकावे, असा टोला वीरकुमार पाटील यांनी विद्यमान आमदारांचे नाव न घेता लगावला.