लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी शनिवारी शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथे पंचगंगा नदीची पाणीपातळी व नदीकाठावरील पूरपरिस्थितीची पाहणी केली. पूरपरिस्थितीची पाहणी केल्यानंतर महाराष्ट्र व कर्नाटकमधील उपस्थित अधिकाऱ्यांसोबत बोरगाव येथे आढावा बैठक झाली.यावेळी चिक्कोडी मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्किरे, बेळगावचे जिल्हाधिकारी आर. जे. हिरेमठ, बेळगावचे जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निम्बर्गी, प्रांताधिकारी रवींद्र करलिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी मनोजकुमार नाईक, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता सी. डी. पाटील, चिक्कोडीचे तहसीलदार एस. संपगावी, इचलकरंजीचे प्रांताधिकारी विकास खरात, शिरोळच्या तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, पाटबंधारे विभागाचे अभियंता शिरीष पाटील, इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक पाटील, नायब तहसीलदार श्रीमती सनदी, आदी उपस्थित होते.गतवर्षी २०१९ मध्ये महापुरामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची दखल घेत, महापुरासाठीच्या नियोजनाबाबत जलसंपदा मंत्री जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, कर्नाटकचे जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीमध्ये आलेल्या महापुराचा आढावा व संभाव्य महापुराबाबत कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबतचे नियोजन निश्चित केले होते.मागील चार दिवसांपासून महाराष्ट्रातील प्रमुख धरणक्षेत्रांत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली भागांत महापुराची परिस्थिती निर्माण होऊ पाहत आहे. दोन्ही राज्यांकडून सध्या समन्वय राखला जात आहे. यापुढे तो कायम ठेवावा, असे उपस्थित अधिकाऱ्यांना मंत्री जारकीहोळी व आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांनी आदेश दिले. पुढील काळासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांबाबत अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. सध्या महाराष्ट्रामधील प्रमुख धरणांमधून १,५६,००० क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे, तर कर्नाटकमधील अलमट्टी या प्रमुख धरणामधून २,२०,००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत असल्याची माहिती आढावा बैठकीमध्ये दोन्ही राज्यांतील पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली,महापुरामुळे दोन्ही राज्यांमधील गावांना व जनतेला नाहक त्रासाला सामोरे जावे लागू नये; त्याचबरोबर त्यांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी आवश्यक ती खबरदारी कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना मंत्री श्री. जारकीहोळी व राज्यमंत्री श्री. यड्रावकर यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.--फोटो पूरस्थिती पाहणी नावाने कोलडेस्कला मेल केला आहे.-ओळ : आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी शनिवारी शिरोळ तालुक्यातील शिरदवाड येथे पंचगंगा नदीची पाणीपातळी व नदीकाठावरील पूरपरिस्थितीची पाहणी केली.
महापुराबाबत महाराष्ट्र, कर्नाटक दोन्ही राज्यांमध्ये समन्वय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 7:43 PM
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हा पूर : सार्वजनिक आरोग्य राज्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर आणि कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री रमेश जारकीहोळी यांनी ...
ठळक मुद्देमहापुराबाबत महाराष्ट्र, कर्नाटक दोन्ही राज्यांमध्ये समन्वययड्रावकर व कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री जारकीहोळी यांनी पूरस्थितीची केली पाहणी