या केंद्रावर संबंधित प्राध्यापकांनी परीक्षा सुरू झाल्यानंतर तेथील पर्यवेक्षकांच्या सहकार्याने कॉपी केली. हे प्राध्यापक परीक्षा खोलीत आले. मी सर्व फिल्डिंग लावली आहे. मी कॉपी करणार आहे, अशी तंबी त्यांनी दिली. त्यांची कॉपी पूर्ण होईपर्यंत इतर विद्यार्थ्यांना बाहेर सोडले नाही, अशा तक्रारी या वर्गातील काही परीक्षार्थींनी आमच्याकडे केल्या आहेत. त्यानुसार त्याबाबतची तक्रार आम्ही सोमवारी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन विद्यापीठ विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. आर. व्ही. गुरव यांना दिले असल्याची माहिती ऑल इंडिया यूथ फेडरेशनचे राष्ट्रीय वर्किंग कौन्सिल मेंबर गिरीश फोंडे आणि ऑल इंडिया स्टुडंटस् फेडरेशनचे राज्य सेक्रेटरी प्रशांत आंबी यांनी दिली. या शिष्टमंडळात आरती रेडेकर, राम करे, रवींद्र जाधव, प्रताप देशमुख, आदींचा समावेश होता.
चौकट
माहिती घेतली जाईल
या संघटनेने दिलेल्या निवेदनानुसार या प्रकाराबाबत संबंधित केंद्रप्रमुखांकडून माहिती घेतली आहे. त्यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले आहे. पर्यवेक्षकांकडूनही माहिती घेतली जाईल, असे शिवाजी विद्यापीठ सेट समन्वयक प्रा. प्रशांत अनभुले यांनी सांगितले.