कोल्हापूर : येथील कॉर्नवॉलीस मॅसोनिक लॉजतर्फे शहरातील अंध, अपंग व किन्नरांच्या कुटुंबीयांसाठी एक महिना पुरेल इतके धान्य, किराणा, तेल असे सर्व साहित्य असलेल्या ५० किट्सचे वाटप करण्यात आले. मॅसोनिक लॉजच्या शाखा संपूर्ण जगभर असून, लॉजचे सदस्य बंधुभाव टिकविणे व उपेक्षितांचे मदत करण्यासाठी सक्रिय असतात.
लॉजतर्फे जून महिना ‘जागतिक बंधुत्व महिना म्हणून साजरा केला जातो. लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये अंध, अपंग व किन्नर या सर्व घटकांची होत असलेली उपासमार पाहून लॉजतर्फे मदत देण्यासाठी पुढाकार घेतल्याचे मिलिंद धोंड यांनी सांगितले. याप्रसंगी सूर्यकांत पाटील (बुदिहाळकर), अमरदीप पाटील, वासुदेव कलघटगी उपस्थित होते.
फोटो : २७०६२०२१-कोल- मदत वाटप
कोल्हापुरातील कॉर्नवॉलीस मॅसोनिक लॉजतर्फे शहरातील अंध, अपंग व किन्नरांच्या कुटुंबीयांसाठी एक महिना पुरेल इतके धान्य, किराणा, तेल असे सर्व साहित्य असलेल्या ५० किट्सचे वाटप करण्यात आले. यावेळी सूर्यकांत पाटील (बुदिहाळकर), अमरदीप पाटील, वासुदेव कलघटगी उपस्थित होते.