शिये येथील करुणालय अनाथ बालगृहातील मुले आणि कर्मचारी असे मिळून एकूण २७ जणांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये करुणालयातील चार मुली आणि चार मुलांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या कोरोनाबाधित मुलांना सुरुवातीला उपचारासाठी शिये येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र रात्री उशिरा त्यांना शिवाजी विद्यापीठातील डिओटी कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे संस्थेचे प्रमुख आनंद बनसोडे यांनी सांगितले.
दरम्यान, याची माहिती मिळताच तलाठी युवराज केसरकर, ग्रामसेवक रमेश कारंडे, आरोग्य अधिकारी एन. बी. कोळी, डॉ. विलास सातपुते, जयसिंग पाटील, सतीश कुरणे, हंबीरराव कोळी, बाबसाहेब बुवा, अभिजित पाटील, नीलेश कदम, आनंद कांबळे यांनी करुणालय बालगृहाला भेट दिली.