शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

कोरोनानंतर ह्रदयाशी 'गाठ'!, बाधितांच्या रक्तवाहिन्यांत गाठी; जगातील पहिली केस कोल्हापुरात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2022 1:05 PM

कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त झाला ही गोष्ट खरी असली तरी कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना मात्र यापुढेही स्वत:ला जपावे लागणार

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा कोरोनामुक्त झाला ही गोष्ट खरी असली तरी कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना मात्र यापुढेही स्वत:ला जपावे लागणार आहे. विशेषत: ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे त्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. कोराेना झालेल्या किंवा होऊन गेलेल्या रुग्णांना रक्ताच्या गाठी होण्याचा मोठा धोका आहे. अशा रुग्णांना रक्ताच्या गाठी हाेण्याची जगातील पहिली घटना कोल्हापुरात शोधण्यात आल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे.कोरोनामुळे हृदयांच्या स्नायूंना सूजरक्तवाहिन्यात गाठी निर्माण झाल्या की हृदयाकडे होणारा रक्तप्रवाह आणि हृदयाची पंपिंगची क्षमता कमी होते. सर्वसाधारण निरोगी माणसाच्या हृदयाची पंपिंग क्षमता ही ६० ते ६५ टक्के असते. जर पंपिंग क्षमता ३५ टक्क्यापेक्षा कमी आली तर हृदयाच्या स्नायूंना सूज येते.हार्टअटॅक, रक्तात गाठीचे रुग्ण वाढलेमद्यपान, तंबाखू, गुटखा, धूम्रपान यासारखी व्यसने तसेच अतिमांसाहार करणाऱ्या व्यक्तींना रक्तात गाठी होण्याची शक्यता अधिक असते. परंतु अलीकडील काळात कोरोना झालेल्या रुग्णांमध्येही हे प्रमाण वाढत असल्याचे दिसून आले आहे. सर्व प्रकारच्या शुद्ध, अशुद्ध रक्तवाहिन्यात अशा रक्ताच्या गाठी निर्माण होत आहेत. मेंदूत, ह्रदयात, पोटातील वाहिन्यातही त्या झालेल्या आहेत.

कोणी काळजी घ्यावी?

  • ज्यांना आधीपासून हृदयविकाराचा त्रास आहे तसेच कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. डी डायमर लेव्हल वाढणाऱ्या रुग्णांनी काळजी घ्यावी लागते.
  • सर्वसाधारण व्यक्तींची डी डायमर लेव्हलची नॉर्मल व्हॅल्यू ५०० नॅनोग्रॅमच्या आत असते. जर ५०० नॅनोग्रॅमच्या वर गेली तर रक्तात गाठी होण्याचा धोका दहा पटीने अधिक असतो.

काय काळजी घ्यावी?

सर्वात महत्त्वाचे म्हणजे सर्व वयोगटातील नागरिकांनी लसीकरण करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोना होऊन गेलेल्या रुग्णांना धाप लागली, छातीत दुखायला लागले तर आपल्या डॉक्टरांना दाखवावे. छातीची पट्टी, हृदयाची सोनोग्राफी करून घ्यावी.

कोरोना विषाणू नवीन होता. उपचार पद्धती निश्चित नव्हती अशा वेळी कोल्हापुरात २७ मार्च २०२० रोजी ४२ वर्षीय कोरोना रुग्णावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. सातव्या दिवशी त्याचा एक हात अचानक काळा पडायला लागला. एन्जीओग्राफी करून रक्तातील गाठ काढली. कोरोना रुग्णांच्या रक्तात गाठी होतात ही जगातील पहिली केस आम्ही शोधली. त्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर संशोधन झाले. तेव्हापासून कोरोना झालेल्या रुग्णांना रक्त पातळ होण्याचे इंजेक्शन देण्यास सुरुवात झाली. - डॉ. अक्षय बाफना, हृदयशस्त्रक्रिया विभाग प्रमुख, सीपीआर रुग्णालय

टॅग्स :kolhapurकोल्हापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याHeart Attackहृदयविकाराचा झटका