समीर देशपांडेकोल्हापूर : जिल्ह्यात बूस्टर डोससाठी लस उपलब्ध असतानाही आरोग्य कर्मचाऱ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनीच दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. तिसऱ्या लाटेतील कोरोना फारसा त्रासदायक नसल्याने कदाचित हे दुर्लक्ष होत असले तरी याबाबत आरोग्य विभागाने जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे.जिल्ह्यात १० जानेवारी २०२२ पासून बूस्टर डोस देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने जनजागरण मोहीमही हाती घेतली. त्यानंतर १५ ते १८ वयोगटातील लसीकरण सुरू झाले. त्याला शाळांमधून चांगला प्रतिसाद मिळाला.दरम्यानच्या काळात या बूस्टर डोसच्या मोहिमेकडे थाेडे दुर्लक्ष झाल्याचे जाणवते. त्यामुळे नागरिकांनीही यासाठी फारसा उत्साह दाखवलेला नाही, त्यामुळेच आतापर्यंत महिन्याभरात आरोग्य कर्मचाऱ्यांचे केवळ ३१ टक्के, फ्रंटलाइन वर्कर ३२ टक्के, ६० वर्षांवरील २५ टक्के असे एकूण २७ टक्केच काम झाले आहे.कोणाला मिळाला बूस्टर बूस्टर मिळाला बूस्टर बाकीआरोग्य कर्मचारी ६,५७९ १४,७४२फ्रंटलाइन वर्कर ७,१३९ १५,४५०ज्येष्ठ नागरिक २४,३३९ ७४,१३१
कोणत्या तालुक्यात किती बूस्टर दिले?तालुका बूस्टरआजरा ८५३भुदरगड ६८७चंदगड १,०८३गडहिंग्लज २,३२०गगनबावडा १५१हातकणंगले ७,५११कागल १,२९२करवीर ३,५५४पन्हाळा १,९३३राधानगरी १,७१५शाहूवाडी १,२२१शिरोळ ३,८९२कोल्हापूर महापालिका ११,८४५एकूण ३८,०५७
का नाही घेतला बूस्टर?नाव सांगण्यास नकार देण्यााऱ्या कर्मचाऱ्यांनी बूस्टर डोस घेण्यास अनेक कारणे असल्याचे सांगितले. काहीजणांनी अजून ९ महिने पूर्ण झालेले नाहीत, आजारपण आहे, नेमके कारण नाही; पण घेतला नाही, अशी कारणे सांगितली.
आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर, ज्येष्ठ नागरिक यांनी बूस्टर डोस घेण्याची गरज आरोग्य विभागाच्या वतीने सातत्याने सांगण्यात आली आहे. यासाठी जनजागरण करण्यात आले आहे. यासाठीचे आवश्यक डोसही उपलब्ध आहेत; परंतु या बूस्टर डोस घेण्यासाठीची अनेकांची आग्रही मानसिकता दिसत नाही. वरिष्ठांशी चर्चा करून याबाबत दिशा ठरवली जाईल. -डॉ. फारुक देसाई, समन्वयक, लसीकरण समन्वयक