कोल्हापूर: कडक लॉकडाऊन शिथिल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी कोरोनाने आपले रंग दाखवत आकडा तब्बल २५९९ वर नेऊन ठेवल्याने कोल्हापूरकरांच्या पायाखालची वाळूच सरकली आहे. मृत्यूचा आकडा ४५ वर स्थिर राहिल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर शहरात आजवरचा सर्वाधिक ६४७ रुग्णाचा आकडा गाठला आहे, पाठोपाठ हातकणंगले ३६४ तर करवीर मध्ये ३५८ रुग्ण सापडले आहेत.कोल्हापुरात मार्चपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवण्यास सुरुवात केली. बुधवारी या लाटेने आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार २५९९ नवे रुग्ण बाधित आढळले. १६२२ जण कोरोना मुक्त झाले तर १४ हजार १८९ जण अजूनही उपचार घेत आहेत. यात इतर जिल्ह्यातील १६७ रुग्ण आहेत तर मृत्यू झालेल्या ४५ पैकी ४० जण जिल्ह्यातील तर ५ जण जिल्ह्याबाहेरील आहेत.कागल, पन्हाळ्यात धोका वाढलाकागल आणि पन्हाळ्यात फारसा आकडा नव्हता पण बिढवरी पन्हाळ्यात १३५ तर कागलमध्ये १०१ रुग्ण आढळले. पन्हाळ्यात मृत्यूही जास्त झाले आहेत.कोल्हापुरात रुग्णसंख्या दुप्पटकोल्हापुरात दुसऱ्या लाटेत बाधितांचा आकडा जास्तीत जास्त ३00 ते ३६0 पर्यंत गेला होता, पण बुधवारी यात दुप्पटीने भर पडली. तब्बल ६४७ नवे बाधित सापडले.कोरोनाने झालेले मृत्यू
- कोल्हापूर शहर ५ रजोपाध्ये नगर, टाकळा, बिंदू चौक, जरग नगर, सूर्या कॉलनी
- शिरोळ: ३ हेरवाड, आकिवाट, झेंडाचौक शिरोळ
- राधानगरी: १ सावर्डे
- कागल: ४ केनवडे, उंदरवाडी, सांगावं, पसारेवाडी
- हातकणंगले:८ माणगाव, पेठवडगाव, तळदंगे तारदाळ, जे. के. नगर, कबनूर, रांगोळी, अंबप
- करवीर: ५ गोकुळ शिरगाव, उचगाव, आरे, वाकरे, शिरोली
- पन्हाळा: ७ पिसातरी, पोर्ले तर्फ ठाणे, वारणा, जाखले, जोतिबा, मोहरे
- गडहिंग्लज: ३अत्याळ, जरळी, गडहिंग्लज शहर
- इचलकरंजी: ३ खंजीर मळा, आंबेडकर नगर,इचलकरंजी
- इतर जिल्हा
कोगणोली, सांगली, हुक्केरी, कुडाळ, पंत बाळकुंदरीएका दिवसात संख्या हजाराने वाढलीकडक लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर सोमवारी लोकांनी रस्त्यावर एकच गर्दी केली. लॉक उठला त्या दिवशी १५00 चा असणारा आकडा एकदम एका दिवसात एक हजाराने वाढल्याने धडकी भरली असून धोरणाचा आणि वागण्याचाही पुनर्विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे.एवढ्या रुग्णांना ठेवायचे कुठेकोल्हापूर रेडझोनमध्ये आल्याने होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आधीच पेशंटमुळे बेड फुल्ल आहेत, त्यात एकदम १ हजाराने रुग्ण वाढल्याने आणि अजून पुरेसे कोविड सेंटर सुरू झालेले नसल्याने या रुग्णांना ठेवायचे कुठे आणि उपचार करायचे कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.