कोल्हापूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५ वरून १८ टक्क्यांवर आली असून, यामुळे जिल्ह्याला काहीअंशी दिलासा मिळाला आहे. आरोग्य विभागाकडून आलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील मृत्युदरदेखील अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असून, त्यातील ५० टक्के मृत्यू हे वयोवृद्ध व ७० टक्के मृत्यू हे व्याधिग्रस्त नागरिकांचे झाले आहेत.जिल्ह्याची लोकसंख्या ४२ लाख ४५ हजार २१५ इतकी असून, कोरोनाची पहिली व दुसरी लाट असे मिळून एक लाख १२४ नागरिक बाधित झाले आहेत. सध्या सक्रिय रुग्ण १४ हजार ८४४ इतके आहेत. जिल्ह्यातील ३ हजार ४४८ मृत्यूपैकी ४२४ मृत्यू हे अन्य जिल्ह्यांतील आहेत. रुग्णालयात उशिरा दाखल होणे, घरीच उपचार करणे, आजाराची माहिती लपविणे, सामाजिक भीती अशी अनेक कारणे यामागे आहेत.लसीकरणात जिल्ह्यातील ९ लाख १३ हजार ६५० नागरिकांनी पहिला डोस, तर २ लाख २८ हजार ८९४ लोकांनी दुसरा डोस घेतला असून, ही टक्केवारी लोकसंख्येच्या २८ टक्के इतकी आहे.आरोग्य यंत्रणा झाली सक्षम ऑक्सिजन बेड आयसीयू बेड व्हेंटिलेटर बेड ऑक्सिजनची उपलब्धता
- पहिली लाट : २ हजार ३९६ ३५० १४० २८ मेट्रिक
- दुसरी लाट ३ हजार १७४ ६४८ ३०० ५२ मेट्रिक टन
- कोविड काळजी केंद्रे : ८३
- समर्पित कोविड केंद्रे : ९३
- कोविड रुग्णालये : १२
- जिल्ह्यात १४ ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती केंद्रांची उभारणी सुरू