कोल्हापूर: एका बाजूला कोरोनामुक्तीचा आलेख वाढत असल्याने दिलासा मिळत असताना कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. शुक्रवारच्या तुलनेत रुग्णसंख्या कांहीशी कमी झाली असलीतरी अजूनही आकडा दीड हजाराच्यावरच असल्याने चिंता कायम आहे. शनिवारी नवे १७७६ रुग्ण आढळले असून ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. १६९३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.दरम्यान अजूनही कोल्हापूर शहरात सर्वाधिक ४०० रुग्ण आहेत. करवीरमध्ये ३४६, हातकणंगलेत २३१ सर्वाधिक रुग्ण आहेत. पन्हाळा व शिरोळ तालुक्यातही पुन्हा रुग्ण वाढू लागले आहेत. दरम्यान हातकणंगले २३१ रुग्णसंख्या असलीतरी शनिवारी केवळ एकच मृत्यू झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. यालट कोल्हापूर शहरात अजूनही रुग्णसंख्या आणि मृत्यू संख्याही जास्त आहे.आज झालेले मृत्यू
- कोल्हापूर शहर: ११ जाधववाडी, सावरे कॉलनी, राजोपाध्येनगर, रुक्मिणीनगर, उत्तरेश्वर पेठ, कदमवाडी, कदमवाडी, सुर्वेनगर, सानेगुरुजी वसाहत, फुलेवाडी रायगड कॉलनी, राजारामपुरी,
- करवीर: ०७ चिंचवाड, शिये, पाचगाव, बाचणी, चिंचवाड, शिये, शिये,
- पन्हाळा: ०३ बोरीवडे, जाखले, घरपण,
- शाहूवाडी: ०२ सावर्डे शिंदेवाडी, पणुंद्रे,
- शिरोळ: ०२ चिपरी, टाकवडे,
- गडहिग्लज: ०१ वडरगे,
- आजरा: ०१ चिवले,
- हातकणंगले: ०१ शिरोली पुलाची
- राधानगरी: राधानगरी,
- इतर जिल्हा: ०३ राहूरी, शिेगणापूर जत, नागवे कणकवली,