शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

corona cases in kolhapur : म्युकरमुळे तिघांचा मृत्यू, पुन्हा कोरोना रुग्णसंख्या, मृत्युसंख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 11:46 AM

CoronaVirus In Kolhapur : म्युकरमायकोसिसमुळे गेल्या २४ तासांत तिघांचा मृत्यू झाला आहे तर नवे तीन रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. आतापर्यंत सीपीआरमध्ये ८० जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून अजूनही ३१ जणांवर शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन आहे.

ठळक मुद्देम्युकरमुळे तिघांचा मृत्यूपुन्हा कोरोना रुग्णसंख्या, मृत्युसंख्येत वाढ

कोल्हापूर : म्युकरमायकोसिसमुळे गेल्या २४ तासांत तिघांचा मृत्यू झाला आहे तर नवे तीन रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. आतापर्यंत सीपीआरमध्ये ८० जणांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून अजूनही ३१ जणांवर शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन आहे.जिल्ह्यात आतापर्यंत २०९ जणांना म्युकरची लागण झाली होती. त्यापैकी ३३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४० जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या २०९ जणांवर उपचार सुरू आहेत. यातील ९१ जण सीपीआरमध्ये तर ३९ जण खासगी रुग्णालयात दाखल आहेत.

नवे रुग्ण १२४९, ३९ जणांचा मृत्यूकोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढली असून मृत्युसंख्येतही वाढ झाली आहे. मंगळवारी सायंकाळी संपलेल्या २४ तासांत नवे १२४९ रुग्ण नोंदविण्यात आले असून, ३९ जणांचा मृत्यू झाला. १५३८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ८ हजार ९१३ रुग्ण उपचार घेत आहेत.कोल्हापूर शहरात २७३, करवीर तालुक्यात १८४, तर हातकणंगले तालुक्यात १६६ नवे रुग्ण आढळले आहेत, तर ३९ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये कोल्हापूर शहरातील सर्वाधिक १४ मृत्यू असून, त्याखालोखाल हातकणंगले तालुक्यात सातजणांचा मृत्यू झाला आहे.ही रुग्णसंंख्या वाढती असली तरी चाचण्या वाढल्या असताना तुलनेत नागरिक पॉझिटिव्ह येण्याचे आणि कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने सक्रिय रुग्णसंख्याही घटत असल्याचे चित्र आहे.सर्वाधिक मृत्यू कोल्हापुरात

  • कोल्हापूर -१४

घोरपडे गल्ली शाहूपुरी, कदमवाडी, शिवाजी पेठ, नागाळा पार्क, आझाद गल्ली, साळोखेनगर, कोल्हापूर, लक्ष्मीपुरी, महाद्वार रोड, राजारामपुरी, रामानंदनगर, अंबाई टँक, न्यू शाहूपुरी, कसबा बावडा

  • हातकणंगले- ०७

हेर्ले २, पेठवडगाव २, किणी, टोप, तासगाव

  • कागल -०३

वाळवा, रणदिवेवाडी, कसबा सांगाव

  • करवीर -०२

गडमुडशिंगी, कुडित्रे

  • शिरोळ -०२

शिरोळ, नवे दानवाड

  • गडहिंग्लज -०२

कडगाव, भडगाव

  • राधानगरी -०१

घोटवडे

  • इचलकरंजी -०१

 

  • पन्हाळा- ०१

माले

  • इतर ०४

सांगली, निपाणी, एरंडोली, आकूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर