मार्च महिन्यात दुसरी लाट सुरू झाल्यावर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह व निवासी शाळा येथे २८० बेडचे हे केंद्र सुरू केले होते. याशिवाय येथील ग्रामीण रुग्णलयामध्ये ३० बेडचे केंद्र सुरू होते. राशिवडे, कसबा वाळवे, सरवदे, तुरंबे या मोठ्या गावात ही काळजी केंद्रे सुरू होती. जून महिन्यात कोरोनाचा कहर वाढल्यावर एकाच दिवशी ५१८ इतके सर्वाधिक रुग्ण या विविध ठिकाणी व घरी उपचार घेत होते.
गेल्या महिन्यापासून रुग्णसंख्या कमी होऊ लागली. त्यामुळे टप्प्याटप्प्याने ही केंद्र बंद करण्यात आली. शेवटी डॉ. आंबेडकर वसतिगृहातील केंद्र सुरू होते. तेथे एकच रुग्ण होता. त्याची लक्षणे कमी झाल्यावर त्यालाही काल घरी सोडण्यात आले. त्यामुळे हे केंद्र रुग्ण मुक्त झाल्याने ते बंद झाले.