कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत १४ एप्रिल रोजी गावात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडला होता. त्यानंतर रुग्णसंख्या वाढत १९ पर्यंत गेली होती. कोरोना दक्षता कमिटी व आरोग्य विभागाने सतर्कतेने काम करीत संसर्गाला पायबंद घातला, असे सरपंच यांनी म्हटले आहे.
दरम्यान, तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने गाव व परिसरात भीतीचे वातावरण पसरले. प्रांताधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार ,सर्कल अशा विविध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्याच्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने गावात आठ दिवस कडकडीत बंद पाळण्यात आला. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यात यश आल्यामुळे गावाला दिलासा मिळाला आहे, असेही सरपंच पाटील यांनी सांगितले.
चौकट
राधानगरी तालुक्यात सर्वप्रथम गुडाळ येथे कोविड लसीकरणाचा कार्यक्रम घेतला. गावातील ६० वर्षांवरील लसीकरणास पात्र लोक ४९४ आहेत. त्यापैकी ३९८ लोकांना लस दिली आहे. ४५ वर्षांवरील पात्र लोक ६०८ आहेत. त्यापैकी ४०७ लोकांना लस दिली आहे. लस उपलब्ध झाल्यावर लवकरच उर्वरित लोकांना लस देऊन गाव शंभर टक्के पूर्ण करणार आहे.