लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोनामुळे जिल्ह्यात मंगळवारी संपलेल्या २४ तासांमध्ये सर्वाधिक म्हणजे ४४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये इतर जिल्ह्यांतील सातजणांचा समावेश आहे. नवे ९८४ रुग्ण आढळले असून ७४० जण कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आणि मृतांची संख्या कमी येत नसून जाहीर केलेला लॉकडाऊन पुन्हा मागे घेण्यात आल्याने प्रशासनही गोंधळले असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नवे २१९ नवे रुग्ण कोल्हापूर महापालिका क्षेत्रात नोंदविण्यात आले असून, त्याखालोखाल हातकणंगले तालुक्यात १३४ रुग्ण आढळले आहेत. करवीर तालुक्यात ९६, तर गडहिंग्लज तालुक्यात ७६ रुग्ण आढळले आहेत; तर कोल्हापूर शहरातील १० जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत २००२ नागरिकांची तपासणी करण्यात आली असून २९३१ जणांचे स्राव घेण्यात आले आहेत. १३१७ जणांची ॲन्टिजेन चाचणी करण्यात आली असून, ९७९२ जणांवर उपचार सुरू आहेत.
चौकट
कोल्हापूर शहरातील दहाजणांचा मृत्यू
कोल्हापूर १०
फुलेवाडी २, राजोपाध्येनगर २, शिवाजी पेठ, शाहूपुरी, कोल्हापूर, रंकाळा टॉवर, जगतापनगर, ताराबाई पार्क. येथील प्रत्येकी १.
करवीर ०७
पाचगाव, म्हसोबा माळ, गांधीनगर, निगवे दुमाला, मोरेवाडी, उजळाईवाडी, कणेरी, दिंडनेर्ली
इचलकरंजी ०५
चावरे गल्ली नदीवेस, पुजारी मळा, भारतमाता हौसिंग सोसायटी, गांधी कॅम्प, इचलकरंजी
हातकणंगले ०५
चावरे, चंदूर, तारदाळ, कोरोची, पु. शिरोली
पन्हाळा ०२
सालवाडी, कोडोली
चंदगड ०१
अडकूर
गडहिंग्लज ०४
गडहिंग्लज ०२, अत्याळ ०२
राधानगरी ०२
सावर्डे, कळकवाडी
शाहूवाडी ०१
धोपेश्वर