कोल्हापूर : गेल्या २४ तासात जिल्ह्यात १०५४ नवे रुग्ण आढळले असून ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. ९३७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.कोल्हापूर शहरामध्ये सर्वाधिक २६६ कोरोनाचे रुग्ण नोंदवण्यात आले असून करवीर तालुक्यात १४८ रुग्ण आढळले आहेत. कागल आणि शिरोळ तालु्क्यात प्रत्येकी ८८ रुग्ण आढळले आहेत, तर हातकणंगले तालुक्यात ९१ रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अन्य राज्यातील आणि जिल्ह्यातील १५० रुग्ण नोंदविण्यात आले आहेत.सर्वाधिक मृत्यू कोल्हापुरातील
- कोल्हापूर ८
विद्यापीठ रोड, कसबा बावडा २, मोहिते कॉलनी, कदमवाडी, साळोखेनगर, राजेंद्रनगर, ताराबाई पार्क
- करवीर ७
गोकुळ शिरगाव, उचगाव, जठारवाडी, गिरगाव, पाचगाव, पाडळी खुर्द, निगवे दुमाला
- हातकणंगले ५
आळते, कोरोची, चंदूर, रेंदाळ, घुणकी
- शिरोळ ४
राजीव गांधीनगर जयसिंगपूर, शिरोळ, नांदणी २
- इचलकरंजी ३
बुध्दविहार शहापूर, पुजारी मळा, जयभीमनगर
- गडहिंग्लज ३
हनिमनाळ, महागाव, इदरगुच्ची
- पन्हाळा २
आंबवडे, कोडोली
- शाहूवाडी २
साळशी, शिंगारे
- कागल २
कागल, कसबा सांगाव
- आजरा १
भादवण
- भुदरगड १
वेंगरूळ
- राधानगरी १
वाळवा
- इतर ८
सिध्देवाडी मिरज, वालावल ता. कुडाळ, वेतुरे ता. वेंगुर्ला, मालवण, राजापूर, चिक्कोडी, कोरोली खटाव, विटा...म्हणून वाढली होती संख्यागेल्या तीन, चार दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अचानक वाढली होती. परंतु सुमारे सात हजार स्वॅबचे अहवाल प्रलंबित होते. ते रत्नागिरी आणि पुणे येथे पाठवण्यात आले होते. त्याचे अहवाल तीन दिवसात आल्यामुळे ही संख्या वाढल्याचे सांगण्यात आले.