कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाची बाधा झालेले आणखी दोघेजण आढळल्याची माहिती मिळाली आहे. हे दोघे कोल्हापूर आणि इचलकरंजी येथील आहेत. यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या एकुण २९ वर गेली आहे. दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी मुंबई आणि पुण्यासारख्या रेड झोनमधील प्रवाशांना कोल्हापूरात प्रवेश देउ नये, अशी विनंती प्रशासनाला केली आहे.कोल्हापूरात शुक्रवारी सायंकाळी दोन कोरोनाचे रुग्ण आढळल्याची माहिती मिळाली आहे. यातील एकजण इचलकरंजी येथील असून दुसरा कोल्हापूरातील असल्याचे समजते.कोल्हापूरात गुरुवारीच दोघांना कोरोना झाल्याचे सीपीआर प्रशासनाने रात्री उशिरा कळविले होते. आज पुन्हा दोघेजण आढळल्याने चिंता वाढत आहे.दरम्यान, शुक्रवारी दिवसभरात कोल्हापूरातील सीपीआर रुग्णालयातील कोरोना कक्षात २१0 स्वॅब चाचणी अहवाल मिळाले असून हे सर्वच अहवाल निगेटिव्ह आले आहेत.दरम्यान, कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी चार दिवस रेड झोन आणि मुंबई पुण्यावरून येणाऱ्या प्रवाशांना कोल्हापूरला पाठवू नये अशी विनंती प्रशासनाकडे केली आहे.
मुंबई आणि पुण्यावरून आजअखेर ८६ हजार लोक कोल्हापुरात दाखल झाले असून अजून काहीजण येणार आहेत. या रेड झोनमधून गुरुवारी एका दिवसात ६00 गाड्या कोल्हापूरात आल्या असून त्यातील ४00 गाड्या एकट्या मुंबईच्या आहेत.