ठळक मुद्देजिल्ह्यात 9 कम्युनिटी किचनच्या माध्यमातून 1 हजार 73 जणांची सोयचहा, बिस्कीट, नाष्टा आणि जेवणाचा लाभ
कोल्हापूर : जिल्ह्यातील स्थलांतरीत अडकलेल्या कामगार, मजुरांसाठी 9 ठिकाणी कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले आहे. सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण, सायंकाळी चहा, बिस्कीट आणि रात्रीचे जेवण अशी सुविधा या मजुरांसाठी देण्यात आली आहे. याचा लाभ 1 हजार 73 जण घेत आहेत.करवीर तालुका- सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी. हॉटेल आनंद कोझी, लक्ष्मीपुरी. हातकणंगले- घुगरे सर यांचे निवासी गुरुकुल वडगाव. अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव. गगनबावडा- माधव विद्यालय आणि समाज कल्याण निवासी शाळा वसतीगृह. राधानगरी - पर्यटन निवास ग्रामपंचायत राधानगरी. कागल - श्री श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कुल. नवोदय विद्यालय कागल अशा नऊ ठिकाणी कम्युनिटी किचन सुरु करण्यात आली आहेत.