कोल्हापूर : मंगळवार पेठ, भक्तिपूजानगरातील निम्मे रहिवाशी गुजरी, आझाद गल्ली, बाबुजमाल परिसर येथील जुन्या घरांत तसेच नातेवाईकांकडे स्थलांतरित झाले आहेत. कोरोना व्हायरसचा रुग्ण परिसरात आढळून आल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. सध्या येथे राहात असणाऱ्यांना मात्र, जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा जाणवत आहे.कोरोना व्हायरसचा कोल्हापुरातील पहिला रुग्ण मंगळवार पेठेतील भक्तिपूजानगरामध्ये आढळून आल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. येथील रहिवाशी मूळचे गुजरी, महाद्वार रोड, आझाद गल्ली परिसर, बाबूजमाल तालीम परिसर, तटाकडील तालीम, पुष्कराज तरुण मंडळ या परिसरातील आहेत.
येथे जागा अपुरी असल्यामुळे भक्तिपूजानगरामध्ये यामधील काहींनी प्लॅट, बंगले बांधले. आता कोराना व्हायरसचा रुग्ण परिसरात आढळून आल्यामुळे त्यांनी पुन्हा शहरातील मध्य वस्तीमध्ये असणाºया जुन्या घरांत राहण्यासाठी जाण्याची वेळ आली आहे.
या भक्तिपूजानगरातील निम्म्या घरांना रविवारी कुलूप असल्याचे आढळून आले. महापालिकेच्या आरोग्य पथकाने परिसरात सर्वेक्षण मोहीम सुट्टीदिवशीही सुरू ठेवली.
नावालाच सीमा बंदजिल्हा प्रशासनाने भक्तिपूजानगरातील ५०० मीटर क्षेत्र ‘प्रतिबंधित क्षेत्र’ म्हणून घोषित केले आहे. या अंतरावरील सर्व परिसरांतील सीमा बंद करण्यात आल्याचा दावा केला आहे. मात्र, शाहू दयानंद हायस्कूल तसेच ओढ्यावरील रेणुका मंदिर परिसरातील मार्ग खुला आहे. येथून बहुतांशी नागरिक ये-जा करीत आहेत.
जीवनावश्यक वस्तूसाठी पायपीठभक्तिपूजानगरमध्ये कोरोना व्हायरसचा रुग्ण आढळल्याचे वृत्त सर्वत्र पसरले असून, या परिसरात दूध, वर्तमानपत्र, भाजीपाला घेऊन येणाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. यापूर्वी परिसरात भाजी विक्रेते व्यवसाय करीत होते. मात्र, तीन दिवसांपासून त्यांनी येथे व्यवसाय करणे बंद केले आहे.
सध्या येथे राहात असणारे घरात थांबून आहेत. कोणीही बाहेर येत नसून परिसर सामसूम झाला आहे. यापूर्वी घराच्या जवळपास भाजीपाला मिळत होता. आता मात्र, विके्रते कोणीही नाही. वर्तमानपत्र टाकणारेही येणे टाळले आहे. दूध आणण्यासाठीही लांब जावे लागत आहे.आशिष ओसवाल, भक्तिपूजानगर
सध्या रहिवाशी असणारा परिसर
- भक्तिनगर -३६ प्लॅट
- पूजानगर-२८ प्लॅट
- पद्मावती कॉलनी-३0 बंगले
वारे वसाहत, पद्माळा परिसरात सर्वेक्षणमहापालिका प्रशासनाने भक्तिपूजानगरातील ३ किलोमीटर परिसरात गेल्या तीन दिवसांपासून सर्वेक्षण सुरू केले आहे. विभागीय आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर यांच्या मागदर्शनाखाली येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच वारे वसाहत, पद्माळा या परिसराची सर्वेक्षण मोहीमही घेण्यात आली.
सर्वेक्षण करण्यात आलेली घरे लोकसंख्या
- वारे वसाहत- २९५ १४६0
- पद्माळा - १00 ६७0
- एकूण ३९५ २१३0
- पुण्याहून आलेली व्यक्ती-१