शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

corona in kolhapur -शहरातील अंतर्गत मार्ग केले बंद, पोलीस बंदोबस्त कडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2020 7:14 PM

‘कोरोना’ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पोलीस प्रशासनाने कोल्हापूर शहरातील प्रमुख अंतर्गत मार्ग बंद करण्याचे नवे पाऊल गुरुवारपासून उचलले आहे. दिवसभर रस्त्यांवर तुरळक वाहतूक सुरू असली तरी त्यांच्याकडे पोलिसांमार्फत कसून चौकशी केली जात आहे. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या वाहनधारकांची वाहने ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.

ठळक मुद्देशहरातील अंतर्गत मार्ग केले बंद, पोलीस बंदोबस्त कडक वाहनधारकांची कसून चौकशी; दंडाचा बडगा

कोल्हापूर : ‘कोरोना’ विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पोलीस प्रशासनाने कोल्हापूर शहरातील प्रमुख अंतर्गत मार्ग बंद करण्याचे नवे पाऊल गुरुवारपासून उचलले आहे. दिवसभर रस्त्यांवर तुरळक वाहतूक सुरू असली तरी त्यांच्याकडे पोलिसांमार्फत कसून चौकशी केली जात आहे. विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या वाहनधारकांची वाहने ताब्यात घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.कोल्हापूर जिल्ह्यात ‘कोरोना’चा पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसला तरीही ‘कोरोना’ची प्रचंड धास्ती सर्वसामान्य नागरिकांत आहे. त्यामुळे भविष्यात कोणतीही गंभीर घटना उद्भवू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य ती काळजी घेतली आहे. गेल्या चार दिवसांत पोलीस प्रशासनाने जनता कर्फ्यू, जमावबंदी, संचारबंदी, लॉकडाऊन अशा विविध माध्यमांतून जनतेला घराबाहेर पडण्यापासून रोखले आहे.गुरुवारी सकाळी १० वाजेपर्यंत पोलीस बंदोबस्त शिथिल केल्याने जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला घेण्यासाठी नागरिक घराबाहेर पडले. त्यामुळे रस्त्यांवर काही प्रमाणात वर्दळ होती; पण त्यानंतर पोलिसांनी पुन्हा कडक धोरण अवलंबत विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनधारकांवर कारवाईचा बडगा अवलंबला.

प्रत्येक चारचाकी वाहनाची तपासणी केली जात आहे. दुचाकीचालकाला अडवून त्याच्याकडे विचारपूस केली जात आहे. विनाकारण फिरत असल्याचे आढळल्यास त्याच्यावर हेल्मेट, विनानंबर प्लेट, अपुरी कागदपत्रे, आदींबाबत ६०० रुपये दंड आकारणी केली जात आहे.दंड भरा कार्यालयातशहरात कोणत्याही ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्यांच्या दुचाकी जप्त करून त्यांना सुमारे ६०० रुपये दंडाची पावती हाती दिली जात आहे. त्यानंतर ही जप्त केलेली दुचाकी क्रेनद्वारे प्रिन्स शिवाजी पुतळ्यानजीक शहर वाहतूक शाखा व पोलीस उद्यान येथे ठेवण्यात येत आहेत. त्यामुळे दुचाकीचालकांना दंडाची पावती घेऊन कार्यालयातच जाऊन दंड भरून दुचाकी ताब्यात घ्यावी लागत आहे.मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील रस्ते बंदशहरातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या बसस्थानक परिसरात दाभोळकर चौकाकडून परिख पुलाकडे जाणारे दोन्ही रस्ते, वटेश्वर मंदिरासमोर शिवाजी पार्कात जाणारा रस्ता, ताराराणी चौकाकडून मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाणारा रस्ता, दाभोळकर चौक ते सासने मैदान, दाभोळकर चौक ते गोकुळ हॉटेल हे मार्ग बॅरिकेट्स लावून वाहतुकीस बंद करण्यात आले आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर