कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने सुरू केलेल्या घरोघरी सर्वेक्षणात आतापर्यंत ७७ हजार ३९ घरांचा सर्व्हे करून तीन लाख ३३ हजार १७१ नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे.
यामध्ये शुक्रवारी आठ हजार १५५ घरांचा सर्वेक्षण केले असून, ३८ हजार ६५८ नागरिकांची तपासणी केली. १८ मार्चपासून महापालिकेच्या ११ नागरी सुविधा केंद्रामार्फत काम सुरू आहे.भोसलेवाडी, विचारेमाळ, कदमवाडी, बापट कॅम्प, सदर बझार, रुईकर कॉलनी, माकडवाला वसाहत, टाकाळा, विक्रमनगर, टेंबलाईवाडी, बिडी कामगार कॉलनी, नृसिंह कॉलनी, नाना पाटीलनगर, लक्षतीर्थ वसाहत, इंगवले कॉलनी, सर्वेश पार्क, दुधाळी, तोरस्कर चौक, बुधवार पेठ, रंकाळा स्टँड, शुक्रवार पेठ, बाजारगेट, ट्रेझरी, मराठा कॉलनी, कनाननगर, इंदिरानगर, खोलखंडोबा परिसर, देवकर पाणंद, संभाजीनगर, शाहू मिल कॉलनी, शाहूनगर, दौलतनगर, यादवनगर, शाहूपुरी, जागृतीनगर, मातंग वसाहत, नेहरूनगर, रामानंदनगर, जरगनगर, सासने कॉलनी, राजेंद्रनगर, एस. एस. सी. बोर्ड, म्हाडा कॉलनी, बालाजी पार्क, पद्माळा, वारे वसाहत, मंगेशकरनगर, गजानन महाराजनगर परिसरातील नागरिकांचा शुक्रवारी तपासणी केली.