कोल्हापूर : आपत्कालीन परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालून काम करणाºया महापालिकेला नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे. आर्थिक स्थिती बेताची असल्याने पाणीपट्टी, घरफाळा जमा करून नागरिकत्वाची जबाबदारी पार पडण्याची ही वेळ आहे. संचारबंदीमुळे घरातून बाहेर जरी पडता येत नसले, तरी आॅनलाईनने पैसे भरणे शक्य असून, याचा वापर जास्तीत जास्त नागरिकांनी करण्याची आवश्यकता आहे.जगात थैमान घातलेला कोरोना व्हायरस हा संसर्गजन्य आजार आहे. यामुळेच लॉकडाऊन करण्यात आला असून, नागरिकांनी घरात बसण्याचे आवाहन केले आहे. एकीकडे जीव वाचविण्यासाठी सर्वांनी घराबाहेर पडणे टाळले आहे. दुसरीकडे जीवाची परवा न करता महापालिकेतील कर्मचारी नागरिकांना अत्यावश्यक सुविधा देत आहेत. यामध्ये पाणीपुरवठा, स्वच्छता, अग्निशमन दल, कचरा उठाव, तुंबलेली ड्रेनेजलाईन साफ करणे, जनजागृती करणे, भाजी विक्रीच्या ठिकाणी गर्दी न होणे अशी कामे केली जात आहेत.स्थानिक स्वराज्य संस्था असल्यामुळे महापालिकेचा हा सर्व डोलारा पाणीपट्टी, घरफाळा, बांधकाम परवाना फी आदींच्या उत्पन्नातून करावा लागतो. मार्च महिन्यांमध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीमुळे वसुलीवर परिणाम झाला आहे. ४६४ कोटींच्या उद्दिष्टांपैकी केवळ २९४ कोटींची वसुली झाली असून, १७0 कोटींची तूट आली आहे. २0 कोटींची पाणीपट्टी कमी जमा झाली असून, घरफाळाही १५ कोटीने कमी जमा झाला आहे. अशीच स्थिती राहिल्यास पुढील काळात कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होण्यावर परिणाम होणार आहे.संचारबंदीमुळे बाहेर पडता येत नसले तरी महापालिकेच्या वेबसाईटवर जाऊन आॅनलाईनने पाणीपट्टी, घरफाळा जमा करून नागरिकत्वाची जबाबदारी पार पडण्याची गरज आहे. पाच नागरी सुविधा केंद्रही सुरू आहेत. पाणीपट्टीची बिले मिळाली नसल्यास आॅनलाईनवर बिलाचा तपशील घेता येते.महापालिकेची २0१९-२0 मधील वसुलीपाणीपट्टी उद्दिष्टे- ५४ कोटी ५0 लाखवसुली - ३४ कोटी ७४ लाखसांडपाणी अधिभार उद्दिष्टे - ११ कोटी १३ लाखसांडपाणी अधिभार वसुली - ७ कोटी ९ लाखघरफाळा उद्दिष्टे - ५९ कोटीवसुली - ४४ कोटीआॅनलाईन बिल जमा करण्यासाठी सुविधा
http://kolhapurcorporation.gov.in/वेबसाईट-डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू. कोल्हापूर कार्पोरेशन. गर्व्ह. इन+कोल्हापूर कार्पोरेशन होम पेज ओपन + क्लिक आॅनलाईन सेवा + न्यू यूजर रजिस्टेÑशन