कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे आणखीन अकरा रुग्ण आज सायंकाळी आढळले आहेत. यामुळे अजूनही मोठ्या प्रमाणात बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.कोल्हापुरात आज सकाळी पाच, दुपारी दोन आणि सायंकाळी पुन्हा तब्ब्ल अकरा कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने जिल्हा रेड झोनकडे वाटचाल करत असल्याचे दिसत आहे. आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार शाहूवाडी तालुक्यातील वारूळ येथील एक, करंजोशी येथील एक, सांबु येथील दोन, आजरा तालुक्यातील एक, करवीर तालुक्यातील एक, आणि कोल्हापूर शहरातील जवाहर नगर येथील एक, माकडवाला वसाहत येथील एक असे मिळून तबब्ब्ल पाच असे अकरा रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी दुपारपर्यंत नव्या सात बाधित रुग्णांची भर पडली, त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात बाधितांची संख्या एकूण ५८ वर पोहोचली आहे. मुंबई, पुण्यासह परजिल्ह्यांतील नागरिकांचे लोंढे वाढू लागल्याने गेल्या पाच दिवसांत सुमारे ३४ नव्या बाधित रुग्णांची भर पडल्याने जिल्हा हादरला आहे.कोल्हापूर जिल्ह्यात मुंबई, पुण्यातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात आगमन झाल्याने तीच धोक़्याची घंटा कोल्हापूरवासीयांना ठरत आहे. रविवारी रात्री उशिरा जिल्ह्यातील राधानगरी व भुदरगड तालुक्यांतील प्रत्येकी दोन रुग्ण, तर पन्हाळा आणि कोल्हापूर शहरात प्रत्येकी एक रुग्ण आढळला.
सोमवारी दुपारपर्यंत सात नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामध्ये राधानगरी, आजरा आणि शाहूवाडी तालुक्यातील प्रत्येकी तीन तर पन्हाळा तालुक्यातील एका अशा सात नागरिकांची चाचणी पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा हादरला आहे.विशेष म्हणजे, दि. १३ मे रोजी जिल्ह्यात फक्त २४ बाधित रुग्ण होते. पण मुंबई, पुण्याकडील नागरिकांचे लोंढे वाढल्याने गेल्या पाच दिवसांत तब्बल ३४ नव्या बाधित रुग्णांची भर पडल्याने कोल्हापूर जिल्हा रेड अलर्टवर येतो का ही भीती सर्वसामान्य नागरिकांत व्यक्त होऊ लागली आहे.