शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

corona in kolhapur-कोरोना विरुध्दच्या युद्धातील योध्दे व मदत साहित्य नोंदणीसाठी संकेतस्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 2:35 PM

संचारबंदीत नाग‍रिकांना तातडीने मदत व मार्गदर्शन व्हावे यासाठी, जिल्हा प्रशासन व कोल्हापूर डिजास्टर मॅनेजमेंट ग्रुपच्या संकल्पनेतून तसेच आई टी असोशिएशन ऑफ कोल्हापूर यांच्या सहकार्यातून  https://kolhapuriwarriors.com  हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे.

ठळक मुद्देकोरोना विरुध्दच्या युद्धातील योध्दे व मदत साहित्य नोंदणीसाठी संकेतस्थळकोरोना विषाणू विरुध्द लढ्यात भाग

कोल्हापूर- संचारबंदीत नाग‍रिकांना तातडीने मदत व मार्गदर्शन व्हावे यासाठी, जिल्हा प्रशासन व कोल्हापूर डिजास्टर मॅनेजमेंट ग्रुपच्या संकल्पनेतून तसेच आई टी असोशिएशन ऑफ कोल्हापूर यांच्या सहकार्यातून  https://kolhapuriwarriors.com  हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तसेच बाहेरील इच्छुक डॉक्टर्स, दवाखाने, संस्था तसेच नागरिकांना मदत कार्याकरिता यावर आपली नोंदणी करता येणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या हस्ते हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य आधिकारी योगेश साळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक  संजय शिंदे, केडीएमजीचे शांताराम सुर्वे, इंद्रजित नागेशकर, रवीकिशोर माने, अभिजित गाताडे आदी उपस्थित होते.

कोवीड-१९ मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीशी  सामना करण्याकरता महाराष्ट्र शासनाने अनेक उपाययोजना कार्यरत केलेल्या आहेत. लॉकडाऊनच्या परिस्थितीत नाग‍रिकांना तातडीने मदत व मार्गदर्शन  व्हावे यासाठी https://kolhapuriwarriors.com हे संकेतस्थळ सुरु करण्यात आले.

वैद्यकीय व्यावसायिक, पॅरामेडीकल, वॉर्डबॉय, परिचारिका, फार्माशिस्ट, आरोग्य सेवक, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय उपकरणे, दवाखान्यात लागणारे इतर साहित्य, विविध प्रकारच्या सेवा, अन्न धान्याची मदत, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, सुरक्षा सेवा, लाँड्री, वाहतूक, सगणक, तांत्रिक सेवा, डाटा एन्ट्री, प्लंबिंग अशा विविध प्रकारच्या रुग्णालयासाठी लागणाऱ्या सेवा व वस्तू वैयक्तिक किंवा संस्थेच्या माध्यमातून ज्यांना द्यायच्या आहेत अशांनी या संकेतस्थळावर आपली नोंदणी करावी.जिल्ह्यातील किंवा जिल्ह्याबाहेरील व्यक्ती अथवा संस्थांना कोरोना विषाणू विरुध्द लढ्यात भाग घ्यायचा आहे आणि जिल्हा प्रशासनाला मदत करायची आहे. ही मदत वैद्यकीय अगर बिगर वैद्यकीय असेल  अशा व्यक्तींनी यां संकेस्थळावर आपली नोंदणी करावी. या नोंदणीनंतर जिल्हा प्रशासनामार्फत संपर्क साधण्यात येईल. या युध्दात आपल्या सहकार्याने विजय मिळवू असा विश्वास जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी व्यक्त केला.केडीएमजीने जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून शहरामध्ये अशी सोय उपलब्ध करण्याबाबतची संकल्पना मांडली. त्याला आई टी असोशिएशन ऑफ कोल्हापूरच्या सभासदांनी उत्स्फूर्तपणे पाठींबा दर्शविला. https://kolhapuriwarriors.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून इच्छुक डॉक्टर्स, दवाखाने,समाजसेवी संस्था,इतर संस्था तसेच नागरिकांना शक्य असल्याप्रमाणे मदत साहित्य किंवा सेवा पुरवण्याची तयारी नेमकी कोणत्या प्रकारे शक्य आहे हे सर्व देता येण्याची सोय केली आहे. या माध्यमातून कोविड-१९ हे पेंडेमिक मध्ये उद्भवू शकणाऱ्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी तयारी चांगली करता येणार आहे.  

या व्यवस्थेमध्ये जरूर पडल्यास सर्व प्रकारचे आवश्यक असणारे बदल किंवा माहिती संकलन करण्यासाठी जिल्हा प्रशासनास मदत करण्याची जबाबदारी आईटीअसोशिएशन ऑफ कोल्हापूर या संघटनेने घेतली आहे. सर्व सुविधांचा योग्य प्रकारे लाभ घेण्याचे  आवाहन जिल्हा प्रशासन, केडीएमजी व आई टी असोशिएशन ऑफ कोल्हापूर यांनी केले आहे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर