कोल्हापूर : आरोग्य विभागाचे कर्मचारीही निष्ठेने आणि जीव धोक्यात घालून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. आनंदा लाखे हेही त्यांना नेमून दिलेले कचरा उठावाचे काम नित्यनेमाने आणि आनंदाने पार पाडत आहेत.कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊनची स्थिती असताना अनेक हात लोकांना त्रास होऊ नये म्हणून कार्यरत आहेत. आरोग्य विभाग डॉक्टर, कर्मचारी, पोलिस यांच्याबरोबर महावितरणचे कर्मचारीही आपले कर्तव्य बजावत आहेत.
याच्या जोडीला आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे महापालिका आरोग्य विभागाचे कर्मचारी. रोज औषध फवारणी करणे, स्वच्छता राखणे याच्याबरोबरीनेच कचरा उठाव करण्याची जबाबदारीही ते पार पाडत आहेत.याच विभागातील आनंदा लाखे हा कर्मचारीही आनंदाने आपली रोजची सेवा पार पाडत आहे. लाखे यांना कोल्हापूर महापालिकेचे अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. कसबा बावडा येथे त्यांच्या नेमून दिलेल्या भागातील गल्लीत जाऊन आजही तितक्याच तत्परतेने ते काम करत आहेत.
लाखे हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे, त्यांच्यासारखीच सेवा देणारे आरोग्य विभागाचे अनेक कर्मचारी आणि अधिकारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रोज कार्यरत आहेत.