कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या २४ तासांत कमी झाली आहे. १५२२ जण बाधित झाले आहेत. ९११ जण डिस्चार्ज झाले. एकूण २९ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, बुधवारच्या तुलनेत गुरुवारी ५१४ रुग्णांची संख्या कमी झाल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
शहर, जिल्ह्यात कोरोनांची रुग्णसंख्या दोन महिन्यांपासून वाढत आहे. शहरात काही प्रभाग आणि अनेक गावे हॉटस्पॉट बनले आहेत. त्यामुळे आरोग्य प्रशासन तपासणी आणि कोरोना रुग्ण शोधमोहीम व्यापकपणे राबवत आहे. एका दिवसात २८ हजार ५७६ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात १५२२ जण पॉझिटिव्ह आले. तपासणीच्या तुलनेत बाधितांची संख्या कमी असली तरी अजूनही मृत्यूची संख्या कमी झालेली नाही. दोनअंकी मृत्यूचा आकडा कायम आहे. सर्वाधिक मृत्यू हातकणंगले तालुक्यात झाले आहेत. कोल्हापूर शहरात चौघांचा मृत्यू झाला आहे. भुदरगड, शाहूवाडी, चंदगड, राधानगरी, गगनबावडा, आजरा या तालुक्यात एकही मृत्यू नाही. पण या तालुक्यात कोरोनाबाधित आहेत. यामुळे धोका कायम आहे. अजून १३ हजार ९३१ रुग्ण बाधित आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
चौकट
कोरोनाने मृत झालेल्या रुग्णांच्या गावांची नावे अशी : सिरत मोहल्ला येथील दोन मृत्यू, राजारामपुरीतील दोन मृत्यू, फुलेवाडी, पाचगाव, प्रयाग चिखली, मांजरेवाडी, शिरोली दुमाला (ता. करवीर), पुलाची शिरोली, माणगाव, भेंडवडे, आळते, हातकणंगले, इचलकरंजी, हुपरी, कोरोची (ता. हातकणंगले), जयसिंगपूर (ता. शिरोळ), भडगांव, सुळकुड (ता. कागल), पाटपन्हाळा, यवलूज (ता. पन्हाळा), गडहिंग्लजमध्ये दोन मृत्यू, तेरणी, मुगळी (ता. गडहिंग्लज), कारंडे मळा (इचलकरंजी), श्रीराम बझार (इचलकरंजी).